मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
फडणवीस सरकार आरक्षणाचा निर्णय घेत नसल्याने हताश झालेल्या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केलाय. आरपारची लढाई असल्याचे म्हणत, मनोज जरांगे यांनी ‘चलो मुंबई’चा नारा दिला आहे.
याच अनुषंगाने राज्यभरातील मराठा समाज मुंबईकडे आंदोलनासाठी जाण्याची तयारी करतोय. मात्र अशातच मराठा समाजाच्या तरुणाने टोकाचा निर्णय घेत आत्महत्या करण्याचा निर्णय घेतलाय.
मिळालेल्या माहितीनुसार, बळीराम मुळे असे आत्महत्येचा प्रयत्न करणारा 35 वर्षीय तरुणाचे नाव आहे. बळीराम मुळे हा लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात असलेल्या शिंदगी बुद्रुक येथील रहिवाशी आहे.
या युवकाने विषप्राशन करत आत्महत्याचा प्रयत्न केलाय. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या युवकाने सरकारवर गंभीर आरोप केलाय. आपल्या सुसाईड नोटमध्ये सरकार जाणूनबुजून मनोज जरांगे यांना आंदोलन करण्यास भाग पाडत आहे. सरकार वेळकाढूपणा करत आहे.
जाणूनबुजून जरांगेवर उपोषणाची वेळ आणत असा आरोप या तरुणाने केलाय. सरकार आरक्षण संदर्भात निर्णय घेत नसल्यानं हताश झालेल्या या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या त्याच्यावर लातूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
धाराशिवमध्ये २६ वर्षीय तरुणाची आत्महत्या
मराठा आरक्षणासाठी तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काही दिवसापूर्वी धाराशिवमध्ये घडली होती
कळंब तालुक्यातील देवळाली गावात ही घटना घडली होती. तरुणाने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. योगेश संजय लोमटे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव होतं.
योगेशने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली होती. त्यात त्याने आपण मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याचा म्हटलं होतं. मराठा आरक्षण नसल्याने नोकरी मिळत नसल्यामुळे योगेश चिंतेत होता.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज