टीम मंगळवेढा टाईम्स।
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईला होणाऱ्या आंदोलनासाठी मंगळवेढा तालुका व शहरातून हजारो बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत.
मंगळवेढ्यातील शिवप्रेमी चौकातील शिवालयातून प्रस्थान झाले प्रारंभी शिवमूर्तीचे पूजन करुन पंढरपूर-टेंभुर्णी मार्गे मराठा समाज मुंबईकडे कुच करणार आहेत सहभागी होणाऱ्या बांधवांनी येताना आपल्या गाडीला भगवा ध्वज लावला होता.
एकच मिशन मराठा आरक्षण अशा घोषणा देत मुंबईकडे रवाना झाले आपल्या लेकराबाळांच्या उज्ज्वल भविष्यासाठी बहुसंख्येने मराठा बांधव उपस्थित होते.
आंदोलन भरपूर दिवस चालण्याची शक्यता असल्यामुळे जास्तीत जास्त मराठा बांधवांनी यामध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन सकल मराठा समाज मंगळवेढा शहर व तालुक्याच्या वतीने करण्यात आले.
सरकार इतके नालायक असू शकते का?
आपली मुले मरत असताना सरकारला झोप कशी येते? सरकार इतके नालायक असू शकते का? सरकार निर्दयी आहे. निष्ठूर आहे. मराठा समाजाबद्दल हा सर्व विचार करताना मला रात्ररात्र झोप येत नाही. यामुळे आता आरपारची लढाई करण्याचा निर्णय मी घेतला आहे.
आता मी शहीद झालो तरी माघार नाही. माझ्या छातीवर गोळ्या पडल्या तरी मागे हटणार नाही. मराठयांसाठी टोकाचे पाऊल उचलणार आहे. सरकारच्या दारात मरण आले तरी आता माघार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही.
येथून मी एकटा निघतो. परंतु मुंबई जवळ आल्यावर तुम्हाला कोट्यवधी दिसतील. मुंबईत तीन कोटी मराठा दिसणार आहे, असे आमचे नियोजन झाले आहे. आम्ही अनेक गोष्टी उघड केल्या नाहीत.
सरकार ज्या पद्धतीने वागणार तशी आमची रणनीती तयार आहे. मराठा मुलांनी आपले अंथरुण, पांघरुन, जेवणाचे साहित्य सोबत घ्या. सर्वांनी शिस्तीत यावे. व्यसन करु नका. गोंधळ करणाऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात देत, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज