टीम मंगळवेढा टाईम्स।
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे आंदोलन आता आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. आरक्षण मिळेपर्यंत पाण्याला हात लावणार नसल्याचा निर्धार मनोज जरांगे यांनी व्यक्त केला.
सरकारविरोधात जनतेत रोष असल्याचे त्यांनी म्हटले. मागील आठ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. जालन्यातील अंतरवाली सराटे गावात उपोषणावर असलेले मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सरकारवर टीका केली.
जरांगे यांनी म्हटले की, राज्य सरकारविरोधात जनतेत रोष आहे. आरक्षण मिळेपर्यंत आता पाण्याला हात लावणार नाही. मराठा आरक्षणाच्या लढाईतून मी माघार नाही, असेही त्यांनी म्हटले.
जरांगे यांनी म्हटले की, मी पाणी सोडले, आता मी पाणी घेणार नाही, मला माझ्या जातीवर अन्याय मला सहन होणार नाही. जाणून बुजून मराठा तरुण कार्यकर्त्यांवर सरकारने खोट्या केसेस दाखल केल्या आहेत. जाणून बुजून प्रशासन सरकारच ऐकून आंदोलकांचा छळ करत असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला.
मराठा आरक्षण आंदोलनाचा तिसरा टप्पा उद्यापासून सुरू होणार आहे. असे आंदोलनाचे सहा-सात टप्पे होणार आहेत. या एखाद्या टप्प्यात सरकारला आरक्षण द्यावेच लागणार असल्याचे त्यांनी म्हटले.
मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय बैठक
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आज मुंबईत सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले. आम्ही टिकणारं आरक्षण देणार असून सरकार सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. विरोधकांनी सकारात्मक राहिलं पाहिजे.
विरोधी पक्षाची भूमिका महत्वाची असते आपणही सरकारला मदत करणं अपेक्षित आहे, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. आम्ही आरक्षणांच्या बाजूने आहोत. सुप्रीम कोर्टात क्युरीटिव्ह पिटिशन दाखल केली आहे. लवकरच त्याची सुनावणी सुरू होईल, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
ही तर आरपारची लढाई
तरवाली सराटीमध्ये उपोषण करणाऱ्या मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा समाजाचा किती अंत पाहता, असा उलट सवाल केला. सर्वपक्षीय बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर नाराजी व्यक्त केली.
उपोषणाला 8 दिवस झाल्यानंतर सरकार वेळ मागत आहे. सरकारला वेळ दिला तर आम्हाला आरक्षण देणार का, असा प्रश्न त्यांनी केला आहे. आपण पुढील निर्णय समाजाशी बोलून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही लढाई आरपारची असल्याचेही त्यांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज