टीम मंगळवेढा टाईम्स ।
मनोज जरांगे पाटील यांनी आज दुपारी उपोषण स्थगित करणार असल्याची घोषणा केली आहे. सरकारला पुन्हा एक महिन्याच्या वेळ देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 13 आगस्टपर्यंत सरकारने मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
आता उपोषण सोडून लोकांमध्ये जाणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
जरांगे पाटील पुढे म्हणाले, की मला हातपाय दाबून सलाईन लावली. त्यांची माया आहे म्हणून त्यांनी तसं केलं. माझं कुणीही ऐकलं नाही. आता सलाईन लागलीच आहे, तर आता उपयोग नाही.
सलाईन ही जेवणासारखीच आहे. त्यामुळे आता उपोषणाची मानसिकता राहिली नाही. सलाईन लावली म्हणजे उपोषणाला आता अर्थ नाही. सरकारची दमछाक कमी होईल. आता उपोषण सोडून लोकांमध्ये जाणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
ते म्हणाले, की सरकारचा ज्या खुर्चीत जीव आहे, ती खुर्ची ओढण्यासाठी आता मला तयारी करावी लागेल. सलाईन लावून बेगडी उपोषण करणार नाही.समाजाने सलाईन न लावण्याची परवानगी दिली तरच आंदोलन पुढे करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
सरकारवर निशाणा साधताना ते म्हणाले, की ‘सरकारतर्फे कुणीही आलं नाही. कारण आता सरकारकडे मंत्रीच उरले नाहीत. अनेकजण आधीच आले. अशात आता पुन्हा कोणत्या तोंडाने जायचं हा विषय असेल.’
यावेळी त्यांनी सरकारला वेळही वाढवून दिला आहे. सरकारला पुन्हा एक महिन्याच्या वेळ देत असल्याचं सांगत ते म्हणाले, की 13 आगस्टपर्यंत सरकारने मागण्या मान्य कराव्यात.
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 5 वा दिवस आहे. त्यांची प्रकृती पुन्हा खालावली आहे. गेल्या 5 दिवसांत जरांगे यांनी डॉक्टरांना तपासणी करू दिली.
मात्र उपचार आणि पाणी घेतलेलं नव्हतं. त्यामुळे त्यांची प्रकृती आणखीनच खालावली . काल संध्याकाळी उशिरा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र पाटील यांनी त्यांची तपासणी केली. यानंतर अखेर त्यांना सलाईन लावण्यात आली
देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप
जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आरोप केले आहेत. हे प्रकरण १२ वर्षांपूर्वीचं आहे. आता अटक वॉरंट काढलंय, मी दहशतवादी आहे का? मी गेलो जामीन घेतलं आणि कोर्टासमोर उभा राहिले. मग पुन्हा अटक वॉरंट का काढलंय. हे खातं फडणवीस यांच्याकडे आहे. मला जेलमध्ये टाकून मारायचं असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला.
शंभू राजे नाट्य दाखवण्याचा कार्यक्रम होता. त्यामध्ये नुकसान झाले. काहींनी पैसे चोरले. गल्ला माझ्याकडे नव्हता. कमी पडले तर आम्ही इकडून तिकडे आणून द्यायचो. प्रामाणिकपणे काम केले, तो सांस्कृतिक कार्यक्रम होता. नुकसान झाले आम्ही नुकसान वाटून घेतले. आम्ही आमचे दिले पण एकानेही दिले नाही. तेही आमच्याच गळ्यात घातले अशी केस असल्याची माहिती जरांगे पाटील यांनी दिली.
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करणार असल्याचीही घोषणा केलीय. ते म्हणाले की, मला हात पाय दाबून सलाईन लावली. त्यांची माया आहे म्हणून तसं केलं, माझं कुणीही ऐकलं नाही. आता सलाईन लागलीय, आता उपयोग नाही. जेवण सारखंच आहे. उपोषणाची मानसिकता राहिली नाहीय अशा शब्दात जरांगे पाटील यांनी भावना व्यक्त केल्या.
जरांगे पाटलांनी सरकारला इशारा देताना म्हटलं की, सरकारचा जीव ज्या खुर्चीत आहे ती खुर्ची ओढण्यासाठी आता मला तयारी करावी लागेल. सलाईन लावून बेगडी उपोषण करणार नाही. समाजाने सलाईन न लावण्याची परवानगी दिली तरच आंदोलन पुढे करणार. सरकारकडून कुणीही आलं नाही, कारण त्यांच्याकडे मंत्री उरले नाहीत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज