टीम मंगळवेढा टाईम्स।
मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा समाजाला आरक्षण देतांना फक्त शिक्षण आणि नोकरीतच आरक्षण दिलं पाहिजे अशी भूमिका अनेकांनी घेतली आहे.
मात्र, यावर आज मनोज जरांगे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ओबीसी समाजाला आरक्षणामध्ये ज्या काही सुविधा आहेत, त्या सर्व सुविधा मराठा आरक्षण देतांना आम्हाला मिळाल्या पाहिजे असं जरांगे म्हणाले आहे.
ओबीसींना शिक्षण आणि नोकऱ्यासह मिळणार राजकीय आरक्षण सुद्धा मराठा समाजाला मिळालं पाहिजे असं अप्रत्यक्षपणे जरांगे यांनी म्हटले आहे. त्यामुळे यावरून आता ओबीसी समाज आणखीनच आक्रमक होण्याची शक्यता आहे.
मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
मराठा आरक्षण घेताना त्यात राजकीय आरक्षण घ्यायचं की नाही या प्रश्नाला उत्तर देताना मनोज जरांगे म्हणाले की, “आमचं जे काही हक्काचं आहे ते आम्हाला मिळणारच. मात्र, त्यांनी त्यांची स्पष्ट भूमिका जाहीर करावी की, त्यांचा नेमका विरोध कशाला आहे.
आम्ही पूर्वीपासूनच ओबीसी असल्याने ओबीसीचे सर्व हक्क आम्हाला मिळणारच आहे. आमचं हक्काचं आहे त्यामुळे आम्ही का सोडायचं. मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्यासाठी आमचा कोणत्या कारणासाठी विरोध आहे असं त्यांनी स्पष्ट करावं.
आमचं जे काही आहे, त्या सर्व सुविधा आम्हाला मिळाल्या पाहिजे. जे काही ओबीसींना मिळते, ते सर्व काही आम्हाला मिळालं पाहिजे, असे जरांगे म्हणाले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज