टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात कोरोनाने आपली पकड घट्ट केली असून आज तालुक्यातील भोसे येथील एका महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या 23 झाली आहे तर कोरोना बाधितांची संख्या 1 हजार 87 वर गेली आहे.
शहरात व ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढतच चालला असून आज पुन्हा 21 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आज तब्बल 64 जणांना उपचारानंतर घरी सोडणेत आलेले आहे.
आज दि.24 सप्टेंबर रोजी 2 नागरिकांचे स्वब ( RT – PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले आहेत. तसेच आज 139 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट ( RAT ) घेण्यात आलेल्या आहेत.
वरील 139 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी पॉझिटिव्ह 21 आणि निगेटिव्ह 118 जणांचे अहवाल आलेले आहेत.
सदरचे नागरिक हे मंगळवेढा शहर 6 , दामाजीनगर 1 , लक्ष्मीदहिवडी 6 , आंधळगांव 1 , शिरसी 1 , रडडे 1 , शेलेवाडी 2 , भोसे 2 , आणि डोणज 1 येथील आहेत.
सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वब ( RT – PCR ) चे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले नाहीत.
मंगळवेढा तालुक्यात आतापर्यंत 1 हजार 87 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 527 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आतापर्यंत 537 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला आहे.
नागरिकांची योग्य ती काळजी घेत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Mangalwedha taluka Twenty-third victim of Corona Death of a 60-year-old woman
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज