मंगळवेढा टाईम्स टीम । आपला संपूर्ण देश हा सध्या कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, तासागणिक वाढणारा कोरोनाबाधितांचा आकडा ही आपल्यासाठी अत्यंत चिंतेची बाब आहे. असे असले तरीही देशभरातून अनेक दिलासादायक बातम्या देखील समोर येत आहेत. अशीच एक दिलासादायक गोष्ट म्हणजे मंगळवेढामधील कोरोनाबाधितांचा आकड्यात आता घट होताना पाहायला मिळत आहे.
गेल्या एका आठवड्यात मंगळवेढामधील कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट होताना दिसून येत आहे. मंगळवेढामध्ये कोरोनावर उपचार घेऊन बरे होऊन आपल्या घरी जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे निश्चितच ही अत्यंत दिलासादायक गोष्ट आहे.
कोरोना रुग्ण वाढण्याची संख्या मंगळवेढा तालुक्यात सुरू असून आता पर्यत 411 पेक्षा अधिक रूग्ण बरे झाले.बुधवारी 21 रूग्णांची वाढ होऊन तालुक्यात रुग्णसंख्या 944 झाली.
बुधवारी 214 रुग्णांची रॅपिड एंटीजन चाचणी घेण्यात आली त्यामध्ये 18 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले.
मंगळवेढा शहर 9, दामाजी नगर 1,बोराळे 1, चिक्कलगी 1,येळगी 1,जालीहाळ 1,डोंगरगाव 1,हुलजंती 1,लक्ष्मी दहीवडी 1,आंबेचिचोली 1,येथील तर सोलापूरच्या पाठवलेल्यातील मंगळवेढा 1,नंदेश्वर 1,बोराळे 1 असे रुग्ण आढळून आले.
त्यामुळे ग्रामीण भागातील निम्म्याहून अधिक गावात कोरोनाने हजेरी लावल्याचे दिसून येऊ लागले. 515 रुग्ण सध्या कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.18 रुग्ण उपचारादरम्यान मयत झाले.
Mangalwedha taluka The number of people released from ‘Corona’ is higher
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज