mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढा तालुक्‍यातील 47 हजार कुटुंबाचे आरोग्य सर्वेक्षण होणार : तहसीलदार रावडे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
मंगळवेढा तालुक्‍यातील 47 हजार कुटुंबाचे आरोग्य सर्वेक्षण होणार : तहसीलदार रावडे

 

टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत शहर व ग्रामीण भागातील 47 हजार 575 कुटुंबाचे सर्वेक्षण केले जाणार असल्याची माहिती तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी दिली आहे.


या सर्वेक्षणातून बाधित रुग्णांची संख्या समोर येण्यास मदत होणार आहे.कोविडच्या नियंत्रणासाठी व मृत्युदर कमी करण्यासाठी आज पासून 15 ऑक्‍टोबरपर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

महसूल पंचायत समिती व आरोग्य खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असताना अशा परिस्थितीत सध्या ही मोहीम यशस्वी करण्यासाठी निकराची लढाई सुरू केली. 

यामध्ये आरोग्य सेवक, सेविका, आशा सेविका, लोकप्रतिनिधींनी दिलेले स्वयंसेवक अंगणवाडी सेविकांच्या समवेत मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षकासह ग्रामस्तरीय समिती पथकांची नियुक्ती करण्यात आली. असून दहा पथकामध्ये एक डॉक्‍टर नियुक्त समाविष्ट करून त्यांच्याद्वारे उपचार व संबंधित सेवा दिली जाणार आहे.

ही मोहीम दोन फेऱ्यांमध्ये राबवले जाणार असून पहिली तरी 15 दिवसाची तर दुसरी फेरी दहा दिवसांची असणार आहे. ही पथके दररोज पन्नास कुटुंबाला भेट देऊन त्या कुटुंबातील सदस्य तापमान, ताप, खोकला, दम लागणे, ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी असणे अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांची तपासणी करतील.


त्यांना आवश्‍यकतेनुसार या सेंटरवर उपचारासाठी दाखल करण्यात येईल. शिवाय यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, किडनी विकार इत्यादी आजारासाठी प्रमाणे लागणारे आवश्‍यक ते औषध प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्णालय स्तरावर उपलब्ध करण्यात येणार आहेत.

यामध्ये मंगळवेढा नगरपालिका हद्द व ग्रामीण भागात यांच्या स्वतंत्ररीत्या पथकाद्वारे हे सर्वेक्षण केले जाणार आहे. यात एकूण 176 पथके नियुक्त केली. त्यात ग्रामीण भागात 166 तर नगरपालिका हद्दीत 10 अशा 176 पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

यामध्ये तालुक्‍यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व गावात या गावातील कुटुंबांचे सर्वेक्षण केले जाणार आहे.

ग्रामीण भागात 152 तर शहरात 45 ऑक्‍सिमीटर, ग्रामीण मध्ये 122 तर 45 शहरांमध्ये 45 थर्मामीटरची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये आरोग्य केंद्र व लोकसंख्या पुढीलप्रमाणे आहे. आंधळगाव 8 हजार 724, बोराळे 8 हजार 151, सलगर बुद्रूक 4143, मरवडे 4526, भोसे 4672 तर शहरातील 4609 लोकसंख्येची तपासणी होईल.

वेळीच उपचार करून त्याचे भविष्यात होणारे नुकसान टाळावे

माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत शहर व ग्रामीण भागात सूक्ष्म नियोजन ग्राम समिती व वार्ड समितीच्या माध्यमातून केले जात आहे. नियुक्त पथकाद्वारे शहर व ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील सदस्य नोंद घेऊन त्याची तपासणी करून वृद्ध, बाधित व्यक्तींना वेळीच उपचार करून त्याचे भविष्यात होणारे नुकसान टाळण्यास मदत होणार आहे. यासाठी ग्रामीण व शहरी नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन प्रशासनाला सहकार्य करावे.- उदयसिंह भोसले उपविभागीय अधिकारी.

Health survey of 47 thousand families started in Mangalwedha taluka

???? राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
कोरोना ब्रेकिंग : मंगळवेढा 13 तर सांगोल्यात पुन्हा मोठी वाढ, वाचा ‘कुठे’ वाढले नवे रुग्ण

कोरोना ब्रेकिंग : मंगळवेढा 13 तर सांगोल्यात पुन्हा मोठी वाढ, वाचा 'कुठे' वाढले नवे रुग्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

मोठी बातमी! सोलापूर ZP चा अध्यक्ष ‘या’ तारखेला ठरणार; तर 11 पंचायत समितीचे कारभारी 12 मार्चला निवडणार…

March 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

March 5, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

खुशखबर! लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; अर्थसंकल्पात मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा

March 5, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मोबाइल वापरण्यास दिला नाही म्हणून १३ वर्षांच्या मुलाची आत्महत्या; सोलापूर जिल्हा हादरला

March 4, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

नियतीचा क्रूर खेळ! पोलीस भरतीची तयारी अन् जिद्दीचा शेवट, भीमा नदीत बुडून अजय काळाच्या पडद्याआड; ब्रह्मपुरीवर शोककळा

March 4, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा