मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील उचेठाण येथील बिभीषण सुतार यांच्या शेताजवळ रामेश्वर महादेव कोळी वरती तलवारीने हल्ला केला व ज्ञानेश्वर भारत कोळी हा सोडविण्यासाठी गेला असता त्यास ढकलून दिल्याप्रकरणी रवी शिवपुजे,आनंद शिवपुजे (दोघे रा.मुढवी ता.मंगळवेढा) व विकास गडदे (रा.उचेठाण) या तिघांविरोधात मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,यातील फिर्यादी व फिर्यादीचा चुलत भाऊ ज्ञानेश्वर असे मोटारसायकल वरून घरी जात असताना बिभीशन सुतार यांचे शेताजवळ आले असता मोटारसायकल (नंबर MH-13 6740 वरून) रवी शिवपुजे,आनंद शिवपुजे व विकास गडदे यांनी फिर्यादीची गाडी थांबवून तु विकास गडदे यास काहीपण शिकवतोस काय असे म्हणून रवी शिवपुजे व आनंद शिवपूजे यांनी त्याचे हातातील तलवारीने फिर्यादीच्या उजव्या हातावर डोकीत व पाठीत मारून गंभीर जखमी केले व शिवीगाळी दमदाटी केली.
त्यावेळी चुलत भाऊ ज्ञानेश्वर हा फिर्यादीस सोडविण्यासाठी आला असता आनंद शिवपुजे याने ढकलून दिले त्यामध्ये त्यास उजव्या पायाचे गुडघ्यावर जखम झाले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे.
याप्रकरणी आरोपीविरुद्ध भा.द.वि कलम 307, 326,341,504,506, 34 प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे हे करीत आहेत.
दरम्यान मंगळवेढा तालुक्यात गेल्या काही दिवसापासून अशा प्रकारच्या घटनेत वाढ झाली असून याप्रकरणी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज