टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरातील मुरलीधर चौकात असलेले अंबिका इलेक्ट्रॉनिक्स, श्रीराम भुसार दुकान, टेलरिंग दुकान या तीन दुकानांना पहाटे ४.३० च्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने एकच कल्लोळ उडाला.
नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने येवून ही आग आटोक्यात आणल्यानंतर दुकानदारांचा जीव भांडयात पडला. या घटनेत ३ दुकानदारांचे जवळपास २३ लाखाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
या घटनेची हकिकत अशी, शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या मुरलीधर चौकातील जुन्या बँक ऑफ इंडियाशेजारी असलेले अंबिका इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला पहाटे शॉटसर्किटमुळे आग लागली.
ही आग वाऱ्यामुळे पसरत लगत असलेल्या श्रीराम भुसार व टेलरिंग दुकानाला लागल्याने आगीचे लोट मोठया प्रमाणात पसरत गेले.
या दरम्यान भुसार दुकानाचे चालक भारत साळुंखे हे फिरावयास आल्यानंतर त्यांना आगीचे दृष्य दिसल्यानंतर तात्काळ यांनी भ्रमणध्वनीवरून अंबिका इलेक्ट्रॉनिक्सचे चालक मनोज सुरेश कर्णेकर यांना घटनेची माहिती दिली.
तात्काळ आगीबाबत नगरपालिकेच्या अग्निशामक कळविल्यानंतर दलास अग्निशामकच्या बंबाने आग घटनेचे वृत्त समजताच शहर विज वितरणचे कनिष्ठ अभियंता यांनी भेट देवून पंचनामा केला आहे.
या दुर्घटनेत अंबिका इलेक्ट्रॉनिक्सचे १५ लाख, श्रीराम भुसारचे ५ लाख, गोपाळ कोकरे यांचे ३ लाख असे एकूण २३ लाखाचे नुकसान झाल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात आले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज