मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन मंगळवेढा सकल मराठा समाजाच्या वतीने पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांना देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी सातत्याने लढा देत असून त्यांच्या नेतृत्वामुळे राज्यभरात मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे.

परंतु काही असामाजिक प्रवृत्तीकडून त्यांच्या जिवीतास धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांतून समोर येत आहेत.

मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत संवेदनशील स्वरूपाचा असून जनतेमध्ये या विषयी तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.

त्यामुळे आपणास विनंती आहे की, या प्रकरणाची सखोल चौकशी व जीवे मारण्याचा कट रचणाऱ्या आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

तसेच, जरांगे पाटील यांच्या सुरक्षेचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यक असलेली शासकीय सुरक्षा तत्काळ पुरविण्यात यावी अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










