mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

तहसील कार्यालयातून पळून गेलेले वाळूचे वाहन व आरोपी पकडण्यात पोलिसांची होतेय टाळाटाळ

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
तहसील कार्यालयातून पळून गेलेले वाळूचे वाहन व आरोपी पकडण्यात पोलिसांची होतेय टाळाटाळ

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तहसील कार्यालयाच्या आवारातून वाळूचा टेंपो पळवून नेण्याच्या घटनेला पंधरा दिवसाचा कालावधी उलटला असतानाही अदयापही वाहन मालक तथा आरोपी सर्वेश्‍वर दामू शेजाळ (रा.गोणेवाडी) याला पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे.दरम्यान,आरोपीचा भाऊ पोलिस खात्यातील असल्याने आरोपीस पकडण्यास टाळाटाळ होत असल्याची चर्चा होत आहे.दरम्यान,कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ.सुहास वारके यांनीच या कामी लक्ष घालून या घटनेचा पर्दाफाश करावा अशी मागणी जोर धरीत आहे.

         

या घटनेची हकिकत अशी,दि.4 जुलै रोजी पहाटे 4.00 वा. मौजे बावची गावालगत असलेल्या सरकारी ओढयातून बेकायदा वाळू उपसा होत असल्याची माहिती मंडल अधिकारी एस.एन.घुगे यांना मिळताच ते पथकासह ओढयाकडे जात असताना टेंपो नं.एम एच 13 सी.यु.4945 या मधून वाळू घेवून येत असल्याने त्यास हात करून थांबविले.व  हा वाळूचा टेंपो जप्त करून तो मंगळवेढा तहसील कार्यालयाच्या आवारात आणून लावला होता. सकाळी 7.00 ते 9.00 च्या दरम्यान आरोपी सर्वेश्‍वर दामू शेजाळ याने शासनाच्या रखवालीतून लबाडीने चोरून नेला असल्याची फिर्याद तलाठी बदन राठोड यानी दिली होती. हा टेंपो पळवून नेवून पंधरा दिवसाचा कालावधी लोटला याचा तपास पोलिस कर्मचारी तुकाराम कोळी हे करीत आहेत.

         

शासनाची मालमत्ता चोरीला जावूनही तपासात दिरंगाई होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.आरोपी हा मंगळवेढा शहरातून उथळ माथ्याने फिरताना नागरिकांना दिसतोय मात्र पोलिसांनाच का दिसत नाही असा सवालही विचारून तपासावर शंका व्यक्त केली जात आहे. दबक्या आवाजात आरोपीचा भाऊ पोलिस खात्यामध्ये असल्यामुळे शासकीय मालमत्तेची चोरी होवूनही तपास करण्यात तपासिक अंमलदार दिरंगाई करीत असल्यची खमंग चर्चा शहरातून सुरु आहे. पळवून नेलेला टेंपो जवळा परिसरात आरोपीच्या नातेवाईकाकडे असल्याची माहिती  त्या तपासिक अंमलदाराला माहिती असतानाही ते वहान अदयापही जप्त केले नाही.एकंदरीत या घटनेत आरोपीला पकडणे व वाहन जप्त करणेकामी गांभिर्यपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचे उघड होत आहे.

टेंपो पळून जावून पंधरा दिवसाचा कालावधी उलटला आरोपी हा मंगळवेढयात उथळ माथ्याने फिरत आहे. आरोपीचा भाऊ पोलिस खात्यात असल्यामुळे तपास करणारा पोलिस आरोपीस पकडण्यास विलंब करीत आहे.

– सत्यवान घुगे,मंडल अधिकारी हुलजंती मंडल

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: CrimeMangalWedhaSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मच्छर चावल्याने कोरोनाची लागण होते का? नव्या संशोधनानंतर समोर आली ‘ही’ माहिती

मच्छर चावल्याने कोरोनाची लागण होते का? नव्या संशोधनानंतर समोर आली 'ही' माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

मोठी बातमी! भोंदूबाबाचा पाय आणखी खोलात; अशोक खरात विरोधात ‘हा’ गुन्हा दाखल

April 6, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

नवीन मोबाईलसाठी धरला हट्ट, घरच्यांनी नकार देताच 21 वर्षीय तरुणाने संपवलं जीवन; सोलापूर जिल्हा हादरला

April 6, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

जनता संभ्रमात! भगीरथदादा, तुमची निष्ठा नेमकी कुणाकडे? ​बीआरएस, काँग्रेस, राष्ट्रवादी अन् आता शिवसेना; भालकेंच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिकांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संताप

April 6, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

मंगळवेढ्यात काळजाचा थरकाप! सुसाट कंटेनरने हिरावले दोन तरुण प्राण; गावावर शोककळा, एकाचा जागीच मृत्यू तर दुसऱ्याची रुग्णालयात प्राणज्योत मालवली

April 5, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

‘मायबाप जनता’ की सत्तेचा सुगंध? भगीरथ भालकेंच्या ‘पक्षांतराची’ मंगळवेढा-पंढरपुरात मोठी चर्चा

April 5, 2026
पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्यानं सोलापूर विमानतळाचे उद्घाटन लांबले; मुख्यमंत्र्यांचा दौरा सहाव्यांदा पुढे ढकलला, आता ‘या’ तारखेला नियोजन

सोलापूरकरांची प्रतीक्षा संपली! आता हैदराबादसाठीही उड्डाण; बुकिंगला सुरुवात, ‘या’ तारखेला होणार पहिले उड्डाण

April 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा