मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । पुणे जिल्ह्यातील येरवडा तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोल(संचित) रजेवर येऊन परत न जाता स्वतःच्या मृत्यू दाखल्याची नोंद करून खोटा दस्तऐवज तयार केला.तो दाखला खरा असल्याचे भासवून शासनाची व येरवडा जेलप्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी लक्ष्मण उर्फ सायकल्या शंकर काळे (रा.डोणज,ता.मंगळवेढा),नितीश मवाली शिंदे (वय ६०,रा.आलेगाव,ता.सांगोला) , अल्फा मवाली शिंदे (वय ५५,रा.आलेगाव) , सोमन्ना व्यंकपा संपागे (वय ७१,रा.डोणज) या आरोपींच्या विरोधात मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी दिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,लक्ष्मण काळे हा अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाणे हद्दीतील गुन्ह्यात येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना १७ डिसेंबर २०१९ रोजी २१ दिवसांकरिता पॅरोल(संचित) रजेवर आला. रजा संपल्यानंतर ८ जानेवारी २०२० रोजी कारागृहात परतणे आवश्यक असताना तो फरार होता. तुरुंगरक्षक जितेंद्र बांदल यांनी मंगळवेढा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल बंडू कुंभार करीत होते.३१ जानेवारी रोजी उल्का शिंदे व सोमन्ना संपागे यांनी आरोपी लक्ष्मण हा २५ डिसेंबर २०१९ रोजी मृत्यू झाल्याचे सांगुन आलेगाव ग्रामपंचायतीचे १२ जानेवारी २०२० रोजीचे मृत्यू प्रमाणपत्र पोलिसांना दिले होते.
पोलिसांनी तसे जेल प्रशासनाला कळवले होते.परंतु खोटे मृत्यूचे प्रमाणपत्र बनवणाऱ्या आणि सादर करणाऱ्याविरूध्द चौघांवर गुन्हा दाखल झाला असून या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे करीत आहेत.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
This News First Publish on mangalwedhatimes.in®
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज