समाधान फुगारे । मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी गावपातळीवर कोरोना रोखण्यासाठी मोठा निर्णय घेतला असून आता गावा-गावात अन् घरा-घरात तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
लवंगी या गावात कॅम्प चे आयोजन केले असता सुरुवातीलाच पहिली टेस्ट मंडळ अधिकारी सत्यवान घुगे यांनी केली त्यामुळे गावातील लोकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.या कॅम्प मध्ये एकूण 204 टेस्ट झालेल्या आहेत. येत्या 15 दिवसात तालुक्यातील सर्व गावात हा कॅम्प आयोजित केला जाणार आहे.
तहसिल कार्यालयामध्ये मागील 4 दिवसापासून विविध महसूल मंडळांमधील लोकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीला ग्रामस्तरीय समितीचे सर्व सदस्य निमंत्रित केले होते.त्यात सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील, कोतवाल, आरोग्य सेवक आणि इतर सदस्य देखील हजर होते.
ग्रामीण भागातील टेस्टिंग वाढवणे, जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे, मृत्यू दर कमी करणे, तसेच गावोगाव कॅम्प आयोजित करून टेस्ट करून घेणे, तसेच कॉविड या आजारांसंबंधी असलेले गैरसमज दूर करणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय तसेच मुख्याधिकारी हे देखील उपस्थित होते.या मीटिंग च्या प्रतिसदमध्ये मानेवाडी गावामध्ये शुक्रवारी लोकांनी 150 टेस्टस केल्या तर आज लवंगी मध्ये 204 टेस्ट झाल्या आहेत.
जास्तीत जास्त नागरिकांनी टेस्ट करून घ्याव्यात
लोकांनी जास्तीत जास्त टेस्टिंग करावे,पॉझिटिव्ह व्यक्तीला वेळीच बाजूला केले तर संसर्ग कमी होतो त्यामुळे जास्तीत जास्त पॉझिटिव्ह व्यक्ती शोधणे गरजेचे आहे.पॉसिटीव्ह निघाला तर शासनाला 1.5 लाख रुपये मिळतात हा केवळ गैरसमज आहे.
कोणतेही पैसे या रुग्णामागे मिळत नाहीत.ज्येष्ठ नागरिक , रक्तदाब , खोकला व मधुमेह असलेल्यांची दररोज तपासणी करावी असे आवाहन ही तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी केले आहे.
Mangalwedha rural Now there will be house-to-house inspections in villages
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज