टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा पोलिस ठाण्याचे नूतन पोलिस निरिक्षक म्हणून रणजित माने यांनी नुकताच कार्यभार स्विकारला आहे.
दरम्यान पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांची नियंत्रण कक्ष सोलापूर येथे बदली झाल्याने त्यांना काल कार्यमुक्त करण्यात आले.
नव्याने रुजू झालेले पोलिस निरिक्षक रणजित माने यांनी सोलापूर शहर,बीड येथे आत्तापर्यंत कामकाज केले आहे.त्यांनी कार्यभार स्विकारताना पोलिस कर्मचारी,नागरिक यांना बरोबर घेवून काम केले जाईल असे सांगितले.
तसेच तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही ते म्हणाले.
मंगळवेढयात पडलेले तीन दरोडे व दरोडयातून झालेला खून व भुरटया चोर्या या घटनांमुळे तालुक्यातील जनता असुरक्षित बनल्याने नवीन पोलिस अधिकार्यांना या घटनेतील आरोपी जेरबंद करणे व जनतेला सुरक्षितता देणे हे एक त्यांच्यापुढे आव्हान आहे.
यावेळी पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांचा बदलीनिमित्त सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले,काम करीत असताना अडचणी हया येत असतात यावर मात करण्याचे कौशल्य अंगीकारले पाहिजे.
दोन वर्षात चांगले व वाईट अनुभव आले.यातून भरपूर काही शिकायला मिळाले.बदली हा पोलिस खात्याचा अविभाज्य भाग आहे.
यापुढील काळात सर्वानी एकत्र येवून टिम वर्क करावे असा स्विट सल्ला त्यांनी यावेळी कर्मचार्यांना दिला.
यावेळी सहाय्यक पोलिस निरिक्षक भगवान बुरसे, बापूसो पिंगळे, सत्यजीत आवटे, अमोल बामणे, पोलिस उपनिरिक्षक विजय वाघमारे, सुभाष शेटे यांचेसह पोलिस कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज