टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा नगरपालिकेच्या पथकाने करधारक व गाळेधारकांकडून एकाच दिवसात 33 जणांकडून साडे 22 लाख रुपये विक्रमी वसुली प्रशासकीय अधिकारी विनायक साळुंखे यांच्या पथकाने केली असल्याची माहिती न.पा.सुत्रांकडून देण्यात आली.
गेली दोन वर्षे कोरोनाचा संसर्ग असल्याने गाळेधारक व कर वसुली म्हणावी तशी झाली नव्हती. परिणामी थकित 105 गाळेधारकांना याबाबतच्या नोटीसा बजावण्यात आल्या होत्या.
या वसुलीसाठी नगरपालिका प्रशासनाने 16 कर्मचार्यांची एक वसुली टिम तयार करून मंगळवेढयाच्या बाजारपेठेत वसुली मोहिम गुरुवारी राबविली.
यामध्ये 33 जणांनी आपले थकित भाडे साडे 22 लाख रुपये जमा केले. जे गाळेधारक आपली थकित रक्कम जमा करणार नाहीत त्यांचे गाळे सील करण्याची प्रक्रिया सुरु असून यामध्ये 6 गाळे सील करण्यात आले आहेत.
गेल्या तीन वर्षापासून कोरोनामुळे वसुली थांबली होती.ही वसुलीची कारवाई आठवडा बाजार शॉपींग सेंटर,चोखामेळा चौक,शिवप्रेमी चौक येथे करण्यात आली.
या कारवाईत टिम प्रमुख म्हणून विनायक साळुंखे, अजय नरळे, सुहास झिंगे, सोमनाथ सरवदे, तर सदस्य म्हणून दिनेश रजपूत, दत्तात्रय इंगळे, दिलीप मुढे, सुभाष नकाते, हरीप्रसाद देवकर, रामचंद्र पवार, बाबासाहेब पवार, गोरख काकडे, हणमंत गडेकर, गणेश माळी, दत्तात्रय भगरे, शंकर वस्त्रे, नागनाथ राजमाने आदींचा या टिममध्ये सहभाग आहे.
ही कारवाईची मोहिम अधिक तीव्र करण्यात येत असून कर थकलेल्यांनी व गाळा भाडेधारकांनी आपला थकित कर भरून न.पा.प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन नगरपालिकेकडून करण्यात येत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज