सुरज फुगारे । मंगळवेढा शहरात व तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक पहावयास मिळत असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या व बळींची संख्याही वाढतच चालली आहे.
शहरातील एका पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर आज आणखी 30 नव्या कोरोना बाधितांची भर पडली असून एकूण रुग्ण संख्याही 635 वर गेली आहे.तर आज उपचारानंतर 11 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
आज सोमवार दि.7 सप्टेंबर रोजी 04 जणांचे स्वब ( RT – PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले आहेत. तसेच आज 562 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत.
वरील 562 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी पॉझिटिव्ह – 30 आणि निगेटिव्ह – 532 जणांचे अहवाल आलेले आहेत. सदरचे नागरिक हे मंगळवेढा शहर 13 , सलगर बु . 7 , गणेशवाडी 2 , घरनिकी 6 , ढवळस 1 , डोणज 1 येथील आहेत.
पाहिजेत
मंगळवेढा शहरात नव्याने सुरू होणाऱ्या मेडिकल स्टोअरसाठी बी’ किंव्हा ‘डी’ फार्मसी झालेल्या अनुभवी मुला मुलींची अर्जंट भरती होणार आहे. संपर्क : 7322020202
सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वब ( RT – PCR ) चे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले नाहीत.
मंगळवेढा तालुक्यात आतापर्यंत 635 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 344 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आता पर्यंत 276 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे.
नागरिकांची योग्य ती काळजी घेत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Fifteenth victim of Corona in Mangalwedha taluka; Another 30 were infected with the corona
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज