समाधान फुगारे । करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी मंगळवेढा शहर व दामाजीनगर आणि चोखामेळा नगर ग्रामपंचायती हद्दीत उद्यापासूनपासून 22 सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यू लावण्यात येणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू राहील.त्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहे. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा मंगळवेढा नगरपालिका प्रशासनानं दिला आहे.
करोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर मंगळवेढामध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. आरोग्य यंत्रणा आणि नगरपालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजनांची अंमलबजावणी करून शहरातील संसर्ग रोखण्यात यश मिळवत आहे. मंगळवेढा शहरासह तालुक्यातील रुग्णांची संख्या 600 उंबरठ्यावर पोहोचली आहे. यातील तीनशेहून अधिक रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
मंगळवेढा तालुक्यात आजपर्यंत 13 रुग्णांचा करोनामुळे बळी गेला. संसर्ग वाढू नये, यासाठी उपाययोजना करण्याबाबत रविवारी नगरपालिकेचे पदाधिकारी, सर्वपक्षीय नेते आणि व्यापारी संघटना यांची बैठक झाली होती. या बैठकीत पुन्हा जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार उद्यापासून सोमवारी जनता कर्फ्यूला सुरुवात होणार आहे.
करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू राहील त्यानंतर 22 सप्टेंबरपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. केवळ रुग्णालये, मेडिकल, दूध विक्री आणि बँकांचेच कामकाज सुरू राहणार आहे.
नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन नगरपालिका प्रशासनाने केले आहे. सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याचा इशारादेखील नगरपालिका प्रशासनाने दिला आहे.
पाहिजेत
मंगळवेढा शहरात नव्याने सुरू होणाऱ्या मेडिकल स्टोअरसाठी बी’ किंव्हा ‘डी’ फार्मसी झालेल्या अनुभवी मुला मुलींची अर्जंट भरती होणार आहे. संपर्क : 7322020202
सोमवारचा आठवडा बाजार बंदच
मंगळवेढा शहरात सोमवारी भरवण्यात येणारा आठवडा बाजार बंदच राहणार आहे. त्यांच्याबरोबर फळे व भाजी विक्रेत्यांना देखील सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे.बाजार समितीत सोमवारी होणारा निलाव देखील बंद ठेवण्यात येणार आहे.
Mangalwedha damajinagar chokhamelanagar Gram Panchayat Public curfew again
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज