टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचीही संख्या वाढत आहे.मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथील 70 वर्षाचे पुरुष व शहरातील मेटकरी गल्ली येथील 78 वर्षाचे पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा् आरोग्य अधिकारी यांच्या अहवालात नमूद आहे.
तर शनिवारी तालुक्यात आणखी नव्या 44 बाधितांची भर पडली आहे. त्यामुळे आता एकूण रुग्णसंख्या 583 झाली आहे.विशेष म्हणजे दररोज जशी बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, तसेच कोरोनातून मुक्त झालेल्यांचीही संख्या वाढत आहे.
शनिवारीपर्यंत तब्बल 333 कोरोनाबाधित आजारातून मुक्त होऊन त्यांना सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे आता तालुक्यात अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या केवळ 238 आहे.
मात्र , तरी देखील बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी कायम होत आहे.त्यात आता काही ठिकाणी पान स्टॉल , हॉटेलही खुले झाले आहेत. त्यामुळे कोरोनाचा विळखा कमी होण्याची चिन्हे नाहीत.
दरम्यान आतापर्यंत 322 जण कोरोनावर मात करून ते कोरोनामुक्त झाले आहेत. तर दुसरीकडे आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाचा हा कहर कधी संपणार या प्रश्नांचे उत्तर सध्या तरी कोरोनाकडेच नाही.
आज दि.5 सप्टेंबर रोजी 69 जणांचे स्वब ( RT – PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले आहेत. तसेच आज 515 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत.
वरील 515 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट केलेल्या सर्व नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह 39 निगेटिव्ह -476 आलेले आहेत.सदर नागरीक हे मंगळवेढा 18 , चोखामेळानगर 4 , रडडे 9 , खुपसंगी 6 , सलगर बु .1 , लमाणतांडा 1 येथील निकटतम पॉझिटिव्ह रुग्णाचे संपर्कातील आहेत.
सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वब ( RT – PCR ) चे आज 5 नागरीकांचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे. सदर नागरिक हे जित्ती 3 , मानेवाडी 2 येथील निकटतम पॉझिटिव्ह रुग्णाचे संपर्कातील आहेत.
मंगळवेढा तालुक्यात आतापर्यंत 583 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 333 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आता पर्यंत 238 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे.
नागरिकांची योग्य ती काळजी घेत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज