टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरात व ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.त्यात शहर,चोखामेळा नगर व दामाजीनगर ग्रामपंचायती मध्ये दि.22 सप्टेंबर पर्यंत जनता कर्फ्यू करून देखील कोरोना रुग्णांची वाढ सुरूच असून आज आणखी 38 जणांचा लागण झाली आहे.
आज शुक्रवार दि.11 सप्टेंबर रोजी नागरिकांचे स्वब ( RT – PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले नाहीत. तसेच आज 430 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत.
वरील 430 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी पॉझिटिव्ह 35 आणि निगेटिव्ह 395 जणांचे अहवाल आलेले आहेत.सदरचे नागरिक हे मंगळवेढा शहर 11 , दामाजीनगर 7 , चोखामेळानगर 1 , ब्रम्हपुरी 1 , आंधळगांव 1 , पाटखळ 1 , भाळवणी 2 , निंबोणी 1 , मारोळी 2 , भोसे 2 आणि नंदूर 6 येथील आहेत.
सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वब ( RT – PCR ) चे 3 पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत.सदरचे नागरीक हे मंगळवेढा शहर 1 , चोखामेळानगर 1 आणि लक्ष्मीदहिवडी 1 येथील रुग्णाच्या निकटतम संपर्कातील आहेत.
मंगळवेढा तालुक्यात आतापर्यंत 827 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 366 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आतापर्यंत 445 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे.
नागरिकांची योग्य ती काळजी घेत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Corona patients continue to grow despite public curfew on mangalwedha! Another 38 were positive
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज