टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरात सोमवार रोजी भरणारा बाजार कोरोनाजन्य परिस्थितीमुळे बंद आहे. मंगळवेढा शहर , संत चोखामेळा नगर ग्रामपंचायत व संत दामाजी नगर ग्रामपंचायत मधील सर्व नागरिकांना व व्यवसायिकांना कळविण्यात येते की , त्या ठिकाणी फक्त रोजची मंडई सुरक्षित अंतर ठेवून चालू आहे. फक्त भाजीपाला व फळे विक्रीसाठी परवानगी आहे.
याच्या व्यतिरिक्त कोणीही सोमवारी आठवडा बाजाराच्या ठिकाणी विक्री करण्यासाठी येऊ नये अन्यथा आपणावर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सोलापूर यांच्या आदेशानुसार योग्य ती दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
याची सर्वांनी नोंद घ्यावी असे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी कळविले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने दुपारी ४.०० वाजेपर्यंत सर्व प्रकारची दुकाने चालू ठेवण्यास परवानगी आहे.
शनिवार व रविवार फक्त अत्यावश्यक सेवा चालू रहातील. सोलापूर जिल्हयात कोरोनाचे रुग्ण वाढत असून कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी , नागरिकांनी कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये , गर्दीच्या ठिकाणी जावू नये , मास्क , सॅनिटायझरचा वापर करावा.असे आवाहनही परचंडराव यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज