मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क ।
वीट भट्टीच्या कामावरील पैसे देण्याच्या कारणावरुन एका महिलेच्या पतीचे मोटर सायकलवरुन अपहरण केल्याचा प्रकार घडल्याने वीट भट्टी मालक बसू बटगर, पिंटू बगले, शिवगोंडा बगले (रा. नागठाणे जि. विजापूर) या तिघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी वैशाली बसवंत केंगार (रा.कात्राळ) हिचा पती बसवंत मारुती केंगार (वय ४०) हे माहे जून २०२१ च्या वीट भट्टी हंगामासाठी वीट भट्टी मजूर म्हणून वीट भट्टी मालक तथा आरोपी बसू बटगर यांच्याकडून ५० हजार रोख स्वरुपात घेतले होते.
त्यानंतर काही दिवसाने फिर्यादीची मुलगी आवाक्का ही आजारी पडल्याने फिर्यादीचे पती कामावर गेले नाहीत.
वीट भट्टी मालक कात्राळ येथे येवून सन २०२०-२१ मध्ये घेतलेले पैसे परत मागीतले असता माझ्या घरामध्ये ऊसतोडी काम करुन मिळालेले पैसे ठेवले होते. ते पैसे त्यांना दिले.
त्यानंतर काही दिवस आम्हांला त्यांनी त्रास दिला नाही मात्र दि.१९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता वरील आरोपीने येवून पुन्हा ५० हजार दे म्हणून दमदाटी करु लागले.
यावेळी फिर्यादीच्या पतीने पैसे यापुर्वी दिले आहेत अशी विनंती करीत असताना वरील आरोपीने फिर्यादीच्या पतीस दुचाकीवर बसवून पळवून नेल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज