टीम मंगळवेढा टाईम्स । स्व.राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी येथील बाळकृष्ण विद्यालयातील शिक्षकांनी पाचवीमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सायकल भेट देऊन शिक्षक दिन साजरा केला. या अनोख्या उपक्रमाबद्दल पालक वर्गातून कौतुक होत आहे.
प्रशालेमध्ये शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक आप्पासाहेब काटकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी प्रवीण चव्हाण, मधुकर चव्हाण, श्रीरंग माने,ज्ञानेश्वर भंडगे,छत्रसाल माळी, भारत पाटील,महिबुब तांबोळी,हणमंत गोडसे,गणपती पवार,अरूण जाधव,महादेव मनगेनी,अशोक केदार, रंगनाथ राऊत,सदाशिव बनसोडे, मय्राप्पा माने,पांडुरंग सलगर,दामाजी साखरे आदी उपस्थित होते.
कोरडा साथीचा प्रादुर्भाव लक्षात घेता सध्या माध्यमिक शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना शासनाने द्यायला शालेय पोषण आहाराचे साहित्य त्यांना वाटप करण्यात आले असून शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना भविष्यात घरापासून शाळेत येण्यासाठी गैरसोय होऊ नये म्हणून शिक्षकांनी स्वखर्चातून पाचवीत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सायकल भेट देण्याचा निर्णय घेतला.
पाहिजेत
मंगळवेढा शहरात नव्याने सुरू होणाऱ्या मेडिकल स्टोअरसाठी बी’ किंव्हा ‘डी’ फार्मसी झालेल्या अनुभवी मुला मुलींची अर्जंट भरती होणार आहे. संपर्क : 7322020202
Mangalwedha bhalavani Bicycle gifts given by the teachers to the newly admitted students in the school
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज