टीम मंगळवेढा टाईम्स।
आश्रम शाळेच्या आवारात लघुशंकेला बसल्याच्या कारणावरून शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या उद्देशाने तलवारीने हल्ला केल्याप्रकरणी अषिश संभाजी काळे, नम्रता आशिष काळे, सखुबाई संभाजी काळे या तीघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना येड्राव ता.मंगळवेढा या गावात घडली आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी कुमार राक्षे यांचे आरोपी आशिष काळे याचेबरोबर पैशाच्या कारणावरून पाठीमागे भांडण झाले होते.
तेव्हापासून राग मनात धरून आरोपी हा शिवीगाळी, दमदाटी करीत होता. दि. 1 जानेवारी रोजी सकाळी 10.00 वा. फिर्यादी व फिर्यादीचा भाऊ आश्रमशाळेच्या आवारात लघुशंकेसाठी गेले होते.
आरोपीने त्या ठिकाणी हातात काठी घेवून येवून तु लघुशंकेला येथे का बसला अशी विचारणा करीत शिवीगाळ करू लागला.
यावेळी फिर्यादीने तु भांडण का करीत आहे अशी तु विचारणा केली असता हातातील काठीने पाठीत,डोकीत दोघांना मारहाण केली.
आरोपीने फिर्यादीच्या मामाच्या घरी घुसून टी.व्हि.कपाट, फ्रिज यांची मोडतोड करून भांडी जमिनीवर आपटून फिर्यादीची मावशी शोभा वाघमारे, मंगल क्षिरसागर यांचेवर तलवारीने जीवे मारण्याच्या उद्देशाने हाता,
कानावर, डोक्यावर वार करून गंभीर जखमी केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज