टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरात व ग्रामीण भागात आज 9 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 1 हजार 240 वर गेली आहे.त्याचबरोबर आज 31 जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.
आज दि.5 ऑक्टोबर रोजी नागरिकांचे स्वब ( RT – PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले नाहीत. तसेच आज 115 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट ( RAT ) घेण्यात आलेल्या आहेत.
वरील 115 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी पॉझिटिव्ह 9 आणि निगेटिव्ह 106 जणांचे अहवाल आलेले आहेत. सदरचे नागरिक हे मंगळवेढा 5 , दामाजीनगर 1 , खवे 1 , लवंगी 1 , भोसे 1 येथील आहेत.
सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वब ( RT – PCR ) चे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले नाहीत.
मंगळवेढा तालुक्यात आतापर्यंत 1 हजार 240 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 1 हजार 81 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आतापर्यंत 133 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे.
सांगोला तालुक्यात आज 41 जणांना लागण तर एका महिलेचा मृत्यू
सांगोला शहरात व ग्रामीण भागात आज पुन्हा मोठी वाढ झाली आहे. 41 जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे तर तालुक्यातील मानेगांव येथील एक महिला उपचारादरम्यान मयत झाली आहे.तर 10 जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.
आज दि.5 ऑक्टोबर रोजी नागरिकांचा 9 स्वब ( RT – PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले आहेत. तसेच आज 233 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट ( RAT ) घेण्यात आलेल्या आहेत.
वरील 233 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी पॉझिटिव्ह 41 आणि निगेटिव्ह 192 जणांचे अहवाल आलेले आहेत.सदरचे नागरीक हे सांगोला 12 , एखतपूर 2 , मेडशिंगी 1 , लक्ष्मीनगर 1 , महुद 2 , जवळा 5 , सोनंद 1 , वासुद 9 , मांजरी 1 , नाझरा 1 , बलवडी 1 , य.मंगेवाडी 1 , घेरडी 1 , खिलारवाडी 1 , चिकमहूद 1 , महिम 1 येथील आहेत.
सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वब ( RT – PCR ) चे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले नाहीत.
सांगोला तालुक्यात आतापर्यंत 1 हजार 976 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 925 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आतापर्यंत 1 हजार 19 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत 32 जणांचा मृत्यू झाला आहे.
नागरिकांची योग्य ती काळजी घेत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Mangalwedha 31 corona free today sangola 41 positive one Death
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज