mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कौतुकास्पद! मंगळवेढ्याचे सुपुत्र डॉ.विजय कुंभार यांना यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर; कर्मवीर पुण्यतिथीदिनी खा.शरद पवार यांच्या हस्ते होणार सन्मान

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 6, 2025
in मंगळवेढा, राज्य, शैक्षणिक
कौतुकास्पद! साताराच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या ‘प्रथम कुलसचिव’ पदी मंगळवेढ्याच्या सुपुत्राची निवड

टीम मंगळवेढा टाईम्स । समाधान फुगारे

सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव व धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातील बँकिंग विषयाचे विभागप्रमुख डॉ. विजय कुंभार यांची रयत शिक्षण संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ साठी निवड झाली असून ९ मे २०२५ रोजी

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार, संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हाईस चेअरमन अॅड. भगिरथ शिंदे, सचिव विकास देशमुख, संघटक डॉ. अनिल पाटील, संस्थेचे सर्व मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य व मान्यवरांच्या उपस्थितीत दिला जाणार आहे.

या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाल्याबद्दल कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.ज्ञानदेव म्हस्के, विद्यापीठाचे अधिकारी, संचालक, स्टाफ यांनी त्यांचे अभिनंदन केले.

रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या प्राध्यापकांनी केलेल्या अध्यापन, संशोधन, विस्तार सेवा, विद्यार्थी व समाजोपयोगी प्रकल्पात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो.

डॉ.विजय कुंभार हे गेली २० वर्षे रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयात अर्थशास्त्र व बँकिंग विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांनी बँकिंग या विषयातून पीएच.डी संपादित केलेली आहे, त्यांचे बँकींग व अर्थशास्त्र या विषयातील ७० पेक्षा अधिक शोधनिबंध विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्स मधुन प्रकाशित झाले आहेत.

इलेक्ट्रॉनिक बँकिंग व ग्राहक समाधान या विषयात त्यांनी केलेले संशोधन उल्लेखनीय असून इलेक्ट्रॉनिक बँकिंग तथा मोबाईल बँकिंग सेवांचा दर्जा तपासणे व त्यामधून ग्राहक समाधानाचे मोजमाप करणे याबाबत त्यांनी विशेष संशोधन केलेले आहे.

धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातील बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व बँक मॅनेजमेंट विभागाच्या माध्यमातून तरुण-तरुणींना बँकिंग क्षेत्रात रोजगार विषयक संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे विशेष योगदान आहे.

या यशाबद्दल आमदार समाधान आवताडे, श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: डॉ.विजय कुंभारसातारा

संबंधित बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

गावात पाणी नाही, मजुरांना पैसे नाही! ग्रामपंचायतींचा आर्थिक कारभार ठप्प; कोर्टाच्या आदेशामुळे सरपंच अडचणीत; ग्रामीण भागात संतापाचा उद्रेक

May 10, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात गांजा विक्रीचे मोठे रॅकेट उध्वस्त; पाच जणांवर गुन्हे, झटपट श्रीमंत होण्याच्या नादात तरुण गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

May 10, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! दहावीच्या परीक्षेत ‘या’ विषयात 80 हजारापेक्षा जास्त विद्यार्थी नापास

May 9, 2026
निराधार लेकरांसोबत सुखाचा घास! उद्योजक संजय आवताडे यांचा वाढदिवस अनाथ मुलांसोबत ‘सहभोजनाने’ होणार साजरा

निराधार लेकरांसोबत सुखाचा घास! उद्योजक संजय आवताडे यांचा वाढदिवस अनाथ मुलांसोबत ‘सहभोजनाने’ होणार साजरा

May 9, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

हाण की बडीव! नवरदेवाच्या बुटांसाठी भर लग्नात राडा, आपापसात भिडले वधू आणि वरपक्ष; झिंज्या धरून फ्री-स्टाईल हाणामारी

May 9, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मोठी बातमी ! राज्यातील ‘या’ वर्गाची शिकण्याची पद्धतच बदलणार; नव्या अभ्यासक्रमाचं गुपित काय?

May 8, 2026
मंगळवेढ्यात भीषण आग! ‘श्री जिजामाता कृषी केंद्र’ खाक, लाखोंची राखरांगोळी; आगीचे कारण…

मंगळवेढ्यात भीषण आग! ‘श्री जिजामाता कृषी केंद्र’ खाक, लाखोंची राखरांगोळी; आगीचे कारण…

May 8, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

जळालेला ट्रान्सफॉर्मर ३ दिवसांत द्या, अन्यथा गाठ माझ्याशी आहे; आमदार समाधान आवताडे यांचा महावितरणला ‘खणखणीत’ इशारा; शेतकऱ्यांच्या विजेसाठी आमदार मैदानात

May 8, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! बेपत्ता तरुणाचा जंगलात सापडला मृतदेह; रागाच्या भरात उचलले टोकाचे पाऊल; मंगळवेढ्यातील तरुणाची हृदयद्रावक आत्महत्या

May 7, 2026
Next Post
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

समाजापुढे आदर्श! परीक्षेत नापास झालाय, आयुष्यात नाही; नापास विद्यार्थ्याच्या आई-वडिलांनी केक कापून केलं सेलिब्रेशन

ताज्या बातम्या

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

संतापजनक! शेतीच्या कारणावरून मुलाचा वडिलांवर चाकूने हल्ला; वडिलांची मुलाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार

May 10, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

गावात पाणी नाही, मजुरांना पैसे नाही! ग्रामपंचायतींचा आर्थिक कारभार ठप्प; कोर्टाच्या आदेशामुळे सरपंच अडचणीत; ग्रामीण भागात संतापाचा उद्रेक

May 10, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात गांजा विक्रीचे मोठे रॅकेट उध्वस्त; पाच जणांवर गुन्हे, झटपट श्रीमंत होण्याच्या नादात तरुण गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

May 10, 2026
शेतकऱ्यांना मोठा आधार! सोलापुरात कांद्याला मिळाला प्रति क्विंटल ‘एवढया’ हजारांचा भाव

​कांदा रडवतोय! ५० पैसे किलो भाव; ७३ पिशव्या कांदा विकून खर्च वजा जाता शेतकऱ्याच्या पदरात उरली चहा-पाण्याइतकीच रक्कम; बळीराजा’चे डोळे पाणावले

May 9, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! दहावीच्या परीक्षेत ‘या’ विषयात 80 हजारापेक्षा जास्त विद्यार्थी नापास

May 9, 2026
निराधार लेकरांसोबत सुखाचा घास! उद्योजक संजय आवताडे यांचा वाढदिवस अनाथ मुलांसोबत ‘सहभोजनाने’ होणार साजरा

निराधार लेकरांसोबत सुखाचा घास! उद्योजक संजय आवताडे यांचा वाढदिवस अनाथ मुलांसोबत ‘सहभोजनाने’ होणार साजरा

May 9, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..