टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील महमदाबाद हुन्नूर येथे एका २० वर्षीय तरूणाने ठिबकच्या पाईपने अज्ञात कारणावरून शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली असून
याप्रकरणी पोलिसात आकस्मात मयत अशी नोंद झाली आहे. दरम्यान,परमेश्वर भगवान क्षीरसागर असे त्या आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी ,दि.२७ रोजी सकाळी १०.३० वा. महमदाबाद हुन्नूर येथील शेतकरी नारायण क्षीरसागर यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला
यातील मयत परमेश्वर क्षीरसागर याने अज्ञात कारणावरून ठिबकच्या पाईपने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे आनंदा घुंबरे यांनी दिलेल्या ख़बरमध्ये म्हटले आहे.
मयत हा खबर देणाऱ्याचा भाचा आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.
गेल्या तीन वर्षांत मुलांचे आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. त्यात तरुणांचे प्रमाण अधिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अभ्यासाचा ताण, नापास होण्याची भीती, नैराश्य, व्यसन, प्रेमभंग या कारणांमुळे मुलं आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत.
आत्महत्या करण्याचे सर्वाधिक प्रमाण हे तरुणांचे आढळून आले आहे. आजकाल तरुण मुले, मुली ही व्यसनांच्या आहारी जात आहे. त्यांच्यात संयम राहिलेला नाही.
पालकांनी जर मुलांना रागविले, अथवा कोणाचा प्रेमभंग झाला तरी मुले लगेच आत्महत्या करतात. पालक व मुले यांच्यातील संवाद हरपला आहे.
मुलगा जर ताणतणावात असेल तर पालक हे समाजाच्या भीतीने त्याला मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन जात नाही.
नैराश्य, ताणतणाव, आजारपण, भीती, चिंता यांसारख्या मानसिक आरोग्याशी निगडित असलेल्या गोष्टी आत्महत्येस कारणीभूत ठरत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज