मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
मंगळवेढा उपविभागीय अधिकारी म्हणून बी. आर. माळी यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला असून येथील शेतकरी व नागरिकांची कामे तसेच प्रलंबीत कामे आदींना प्राधान्य देणार असल्याचे प्रसार माध्यमांसी बोलताना त्यांनी सांगितले.
दरम्यान कार्यभार स्विकारताच तहसिलदार मदन जाधव यांनी महसूल खात्याच्यावतीने पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले.
तत्कालीन प्रांत अधिकारी आप्पासो समिंदर यांच्या कार्यकालात लाचलुचपत विभागाने धाडी टाकल्याने त्यांचा कार्यकाल वादग्रस्त ठरला होता.
राष्ट्रीय महामार्गामध्ये बाधीत झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला देताना शेतकऱ्यांचा नाहक छळ झाल्याने शेतकरी वर्ग त्यांच्या कार्यावर कमालीचे नाराज होते. त्यांच्या बदलीनंतर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आल्याचे चित्र होते.
नव्याने कार्यभार स्विकारलेले माळी हे यापुर्वी याच ठिकाणी तहसिलदार म्हणून तीन वर्षे सेवा चांगल्यापध्दतीने बजावल्याने त्यांच्या स्वागतासाठी अक्षरशः कार्यालयात पुष्पहार घेवून नागरिक, शेतकरी, राजकीय कार्यकर्ते यांची भाऊगर्दी झाली होती.
कार्यभार स्विकारल्यानंतर माळी यांनी आरटीएसची ९४० प्रकरणे २०१८ पासून पेडींग असल्याने या कामाला प्राधान्य देण्यात येईल असे सांगितले. ते मुळचे जत तालुक्यातील असून त्यांना २०१८ साली प्रांत म्हणून बढती मिळाल्याने पन्हाळा, चंदगड येथे प्रांत अधिकारी म्हणून काम केले आहे.
पदाचा कार्यभार घेताच त्यांनी महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची तात्काळ बैठक घेवून अडीअडचणी समजून घेवून घेवून जनतेच्या कामाला प्राधान्य देत पेडींग कामाचा निपटारा करण्याच्या सक्त सूचना करण्यात आल्या आहेत.
सत्कार समारंभ प्रसंगी तहसिलदार मदन जाधव, मंगळवेढा मंडलाधिकारी धनंजय इंगोले, तुकाराम कुदळे, संजय गेजगे, ज्ञानेश्वर भिमदे, देवदत्त पवार, कृष्णा ओमने, आप्पासो अवघडे, गुरुदेव अवघडे यांच्यासह महसूलचे कर्मचारी उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज