टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरात व ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढतच चालला असून आज पुन्हा 18 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.एकाच दिवशी मंगळवेढा तालुक्यातील तिघांचा मृत्यू झाला आहे.
मंगळवेढा तालुक्यातील धर्मगाव येथील 71 वर्षाचे पुरुष, बोराळे येथील 64 वर्षांचे पुरुष,भोसे येथील 53 वर्षाचे पुरुषाचा कोरोना मृत्यू झाला आहे.
तर दुसरीकडे सांगोला तालुक्यात ही एकाच दिवशी 8 जणांचा बळी गेल्याने दोन्ही तालुक्यातील आज 11 बळी गेले आहेत.
आज दि.22 सप्टेंबर रोजी नागरिकांचा 8 नागरिकाचा स्वव ( RT – PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेला आहे.
तसेच आज 258 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट ( RAT ) घेण्यात आलेल्या आहेत.
वरील 258 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी पॉझिटिव्ह 18 आणि निगेटिव्ह 240 जणांचे अहवाल आलेले आहेत.सदरचे नागरिक मौजे मंगळवेढा शहर 7 , चोखामेळानगर 4 , बोराळे 2 , उचेठाण 1 , कागष्ट 1 , शिरसी 1 , लक्ष्मीदहिवडी 1 , भाळवणी 1 येथील आहेत.
सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वब ( RT – PCR ) चे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले नाहीत.
मंगळवेढा तालुक्यात आतापर्यंत 1 हजार 38 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 457 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आतापर्यंत 559 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे.
सांगोला तालुक्यात एकाच दिवशी आठ कोरोनाचे बळी
सांगोला शहरात व तालुक्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत असून आज एकाच दिवशी आठ जणांचा कोरोनाने बळी घेतला असून 50 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे.
दिनांक 22/09/2020 रोजी नागरिकांचे स्वव ( RT – PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले नाहीत.
सांगोला शहर येथील 1 पुरूष व 2 महिला तसेच देवळे 1 पुरूष , एखतपूर 1 पुरूष , बलवडी 1 पुरूष , घेरडी 1 महिला,उदनवाडी 1 महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.
तसेच आज 304 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट ( RAT ) घेण्यात आलेल्या आहेत. 304 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी पॉझिटिव्ह -47 आणि निगेटिव्ह -257 जणांचे अहवाल आलेले आहेत.
सदरचे नागरीक हे सांगोला शहर -10 , मांजरी -01 , वासुद -01 , महुद -05 , कमलापूर -03 , मेडशिंगी -01 , आलेगांव -02 , वझरे -01 , नाझरे -03 , घेरडी -01 , वाकी शिवणे -01 , राजुरी -05 , लोणविरे -08 आणि चिंचोली -05 येथील आहेत.
सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वब ( RT – PCR ) चे 3 पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत . सदरचे नागरिक मौजे सांगोला 1 , नाझरे 1 आणि महुद 1 येथील कोरोना रूग्णांच्या निकटतम संपर्कातील आहेत.
सांगोला तालुक्यात आतापर्यंत 1 हजार 558 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 721 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आतापर्यंत 817 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे.
नागरिकांची योग्य ती काळजी घेत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Corona’s havoc in Mangalvedha and Sangola talukas; 11 people died in a single day
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज