टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील मंडल अधिकारी व तलाठी संघाने विविध मागण्यांसाठी बेमुदत रजा आंदोलन पुकारले असून यासंदर्भात तहसीलदार स्वप्नील रावडे यांना निवेदन देण्यात आले आहे.
याप्रसंगी अध्यक्ष उमेश सूर्यवंशी, सचिव समाधान वगरे, कार्याध्यक्ष विजय एकतपुरे,सदस्य मधुकर वाघमोडे,विजय शिंदे,बाळू कोळी,शामबाला कुंभार, नजमिन मौलवी,बदन राठोड,राजाराम रायभान,सूरज नळे,अनिल चव्हाण,भारत गायकवाड,प्रताप घुनावत,मनोज तवले,सतीश गुरुपवार,मनोज संकपाळ,श्रीरंग लोखंडे,अजय जिरापुरे, भडंगे आदीजन उपस्थित होते.
मंगळवेढा तालुका तलाठी संघाने तलाठी संवर्गातील मंडळ अधिकारी, अव्वल कारकुन व नायब तहसिलदार यांच्या विविध प्रकारच्या 37 मागण्यांसाठी दि.19 जानेवारी 2021पासुन बेमुदत रजा आंदोलन पुकारलेले होते.
त्या अनुषंगाने सोलापुर जिल्हा तलाठी संघाचे पदाधिकारी यांचे समवेत जिल्हाधिकारी डॉ.मिलिंद शंभरकर यांच्या दालनात दि.21 जानेवारी 2021 रोजी बैठक घेण्यात आली होती.
सदर बैठकीत निवेदनात दिलेल्या प्रत्येक मुद्यावर सविस्तर चर्चा करण्यात येवुन तलाठी यांच्या मागण्या मार्च अखेर पर्यंत पुर्ण करण्याचे आश्वासन देवुन संप मागे घेणे बाबत सुचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे सोलापुर जिल्हा तलाठी संघाने व तदनुषंगाने मंगळवेढा तलाठी संघटनेने दि.22 जानेवारी 2021 पासुन संप तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याचा निर्णय घेतला व कामकाज सुरळीत पणे चालु केले.
तसेच जिल्ह्यातील महसुल अधिकारी यांचे दि.29 फेब्रुवारी 2021 रोजीचे नियोजन भवन येथील आढावा बैठकीसाठी सोलापुर जिल्हा तलाठी संघाचे पदाधिकारी यांना बोलाविण्यात आले होते.
त्यावेळी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या अडीअडचणी तात्काळ सोडविणे बाबत जिल्हाधिकारी ,अप्पर जिल्हाधिकारी तसेच निवासी उपजिल्हाधिकारी यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या होत्या.
व अशा प्रकारचे आदेशही जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निर्गमित करण्यात आले आहेत.
तसेच सोलापुर जिल्हा तलाठी संघाचे पदाधिकारी यांचे समवेत बैठक घेण्यात आली व जिल्हाधिकारी यांनी निवेदनातील मागण्यांचे कामकाजाबाबत लेखी कळवुन दि.18 जून 2021 पासुनचे बेमुदत आंदोलन टाळुन प्रशासनास कहकार्य करावे असे पत्र दिले आहे.
सदर पत्राचा आदर करून सो.जि.त.संघाने व मंगळवेढा तालुका तलाठी संघाने तात्पुरत्या स्वरूपात आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
परंतु प्रशासनाकडून वेळोवेळी बैठका घेवुनही व संघाचे पदाधिकारी यांनी मागण्यांबाबत वारंवार पाठपुरावा करून देखील अद्याप पर्यत निवेदनातील मुद्यांबाबत प्रशासन गांभिर्यपुर्वक विचार करताना दिसुन येत नाही.
तलाठी व मंडळ अदिकारी यांच्या अडचणी सोडविणेबाबत प्रशासनाची उदासिनता दिसुन येत आहे. म्हणुन सोलापुर जिल्हा तलाठी संघाने व मंगळवेढा तालुका तलाठी संघटनेने स्थगित केलेले आंदोलन दि.7 जुलै 2021 पासुन बेमुदत रजा आंदोलन करण्यात येत असल्याचे सांगितले.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज