टीम मंगळवेढा टाईम्स।
पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधातून पती, महिलेचा दीर यांनी प्रियकराचा काठीने डोकीत मानेवर तसेच सर्वांगावर मारून जखमी करून तसेच लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून सागर मनोहर इंगोले (वय २९) याचा खून केला.
याप्रकरणी सुभाष होनमुखे व संजय होनमुखे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही अटक केली आहे.
फिर्याद मृताचे वडील मनोहर इंगोले (रा. सलगर बुद्रुक) यांनी दिली आहे. ही घटना शनिवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास मारोळी गावातील होनमुखे वस्तीजवळ घडली.
याबाबत माहिती अशी, फिर्यादी मनोहर इंगोले यांच्या मुलाचे सलगर बुद्रुक येथे मोबाइल शॉपीचे दुकान असून, मोबाइल रिचार्ज व मोबाइल रिपेअर करण्यासाठी आरोपीची पत्नी येत होती.
फिर्यादी शनिवारी सकाळी ६ वाजता दूध घालण्यासाठी गेले असता त्यावेळी गावातील बंडू जाधव याच्याकडून समजले की,
फिर्यादी चा मुलगा सागर इंगोले यास सुभाष होनमुखे, संजय हेनमुखे यांनी पहाटे चार वाजेच्या सुमारास त्यांचे होनमुखे वस्तीजवळ मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला, अशी फिर्याद मनोहर इंगोले यांनी दिली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज