मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा तालुक्यात यंदा पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांचे पशुधन संकटात आले आहे. शेती पिकांची ऑगस्ट उजाडला तरी पेरणी नाही. जेमतेम पावसावर पेरणी केलेली पिके जळून गेली आहेत. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे आज १५ ऑगस्ट रोजी प्रत्येक ग्रामपंचातीमध्ये होणाऱ्या ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी जनावरांसाठी चारा डेपो व छावणी सुरू होण्याचे ठराव तयार करून शासनाला पाठवण्याचे आवाहन श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना चेअरमन शिवानंद पाटील यांनी केले आहे.
पावसाळ्याचे अडीच महिने होऊनही अद्याप तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. चारा व पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
विशेषत: तालुक्याच्या दक्षिण भागात पावसाचा थेंबही दिसून येत नाही.
दीड महिन्यांपूर्वी झालेल्या रिमझिम पावसावर काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. मात्र, पावसाअभावी ती पिकेही कोमेजून जात आहेत. तालुक्यात अद्यापही ६० ते ७० टक्के शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या नाहीत.
मात्र, यामुळे यंदा पिण्याच्या पाण्याच्या समस्येसह शेतकऱ्यांना पशुधन वाचवण्यासाठी संकट ओढावले आहे. पाऊस न पडल्याने चाऱ्याची निर्मिती होऊ शकणार नाही. त्यामुळे पशुधन वाचवण्याचे आव्हान आता शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. रोज शेकडो टन उसाचा चारा म्हणून वापर केला जात आहे
आज १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभांमध्ये शेतकऱ्यांनी मंजुरी घेऊन जनावरांसाठी चारा डेपो अथवा चारा छावणी सुरू व्हावी यासाठी शासनाकडे ठराव पाठवणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे पीक पेरणी न झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून
शासनाने तातडीने मदत जाहीर करावी, विमा कंपन्यांच्या मार्फत गेलेल्या खरीप हंगामातील नुकसान भरुन द्यावे यासाठी देखील ग्रामसभेमध्ये ठराव करून द्यावेत, असेही आवाहन चेअरमन शिवानंद पाटील यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज