सोलापूर व मंगळवेढा रोडवरील माचणूर -बेगमपूर पुलावरील पाणी ओसरल्यानंतर आज सकाळी पूर्णपणे पुराचे पाणी खाली गेले आहे.दरम्यान, पुराच्या पाण्यामुळे पुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
गेले दोन दिवस पुराच्या पाण्यामुळे सोलापूर-मंगळवेढा रोडवरील येणारी जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती.आज सकाळी पुराचे पाणी खाली गेले आहे. मात्र या पुरामुळे पुलाची एका बाजू वाहून गेली आहे तर पुलावर असलेले सुरक्षा कवच हे देखील वाहून गेले आहे.
आज रविवारी दुपारी पुलाची राष्ट्रीय महामार्गच्या अभियंता पथकाकडून तपासणी केली जाणार आहे, वाहतुकीसाठी कोणताही धोका नसल्याबाबत त्याचा अहवाल प्राप्त होताच अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी सोलापूर-कोल्हापूर हा महामार्ग खुला होण्याची शक्यता तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी बोलताना व्यक्त केली.
Breaking! पुरामुळे बेगमपूर पुलाचे मोठे नुकसान; रस्ता उचकला, सुरक्षा कवच गेले वाहून https://t.co/XYsdLKFrTg pic.twitter.com/jW0IO0LLcT
— Mangalwedha Times (@SamadhanFugare) October 18, 2020
दरम्यान, महापूराचे पाणी ओसरल्याने पोलीस व महसूल प्रशावसनावरचा ताण कमी झाल्याने त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.अद्यापही वाहतूक सुरू केलेली नाही.उजनी व वीर धरणातून भीमेच्या पात्रात जवळपास तीन ते चार लाख क्युसेक पाणी विसर्ग असल्याने भीमा नदीला महापूर आला होता.
गेले तीन दिवस भीमा नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे़ बेगमपूर येथील पुलावर पहिल्यांदाच पाच फुटापेक्षा जास्त पाणी वाहिले यामुळे गेले तीन दिवस हा पूल वाहतुकीसाठी बंद आहे. या दरम्यान एस.टी बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. काही प्रवाशांनी कर्नाटक राज्यातून येऊन आपली घरे गाठली.
मात्र हत्तुर येथील पुलावरून ही पाणी वाहू लागल्याने झळकीमार्गे होणारी वाहतूक ठप्प झाली होती. या पुलावरील पाणी आज रविवार सकाळपर्यत पुर्णत: पाणी कमी झाले. आज राष्ट्रीय माहामार्गच्या अभियंता पथकाकडून तपासणी केली जाणार आहे त्यानंतर चारकी वाहनांना पूलावरून प्रवेश दिला जाणार आहे.
तपासणी नंतर पुलावरील पाणी झाल्यावर तपासणीनंतर प्रथमत: दहा टन वजनाची मालवाहतूक गाडी सोडण्यात येणार आहे़ तद्नंतर टप्प्याटप्प्याने अनुक्रमे २० ते ५० टन वजनाची अवजड वाहने सोडली जाणार आहेत.
महापूर कालावधीत पूलावरून प्रवेशकरून कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी तहसीलदार स्वप्निल रावडे व पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक खटके, सपोनि किरण उंदरे यांनी नदीच्या दोन्ही काठावर पोलीस व तलाटी यांचे पथके रात्रंदिवस कार्यरत ठेवली होती.
पूल रिकामा होताच आज रविवारी सायंकाळपासून मंगळवेढा आगाराने सोलापूर मार्गावर एस.टी बसेस सोडण्यासाठी सज्ज ठेवल्या आहेत अशी माहिती आगरप्रमुख गुरुनाथ रणे यांनी सांगितले.
Major damage to Begumpur bridge due to floods; The road lifted, the safety shield was carried away
बंगला विकणे आहे.
३००० चौ.फूट एन.ए.प्लॉट , साधारण ५०० चौ.फूट मध्ये आर.सी.सी. वन बी.एच.के. बांधकाम,बोअरचे मुबलक पाणी , ज्ञानदीप शाळेपासून फक्त ५०० फुट अंतरावर , अपार्टमेंट , बँक , हॉस्पिटल , हॉलसाठी उपयुक्त ठिकाण , कारखाना रोडपासून दोन नंबरचा प्लॉट , दोन रोडटच कॉर्नर प्लॉट योग्य किंमत आल्यास त्वरीत विकणे आहे.
संपर्क:मो.नं.९८९०९८०८७७,९५६१८२११९९
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज