मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
नंदेश्वर प्रतिनिधी/तानाजी चौगुले
महिलांना बचतीचे महत्व कळावे व त्यामाध्यमातून आपला संसार चांगल्यारितीने करावा या उद्देशाने बचत गटाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून तालुक्यात बचत गटाची चळवळ चांगल्या पद्धतीने निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून भोसे ता. मंगळवेढा येथे भोसे प्रभागातील स्वयंसहायता बचत गटाची प्रभाग संघाची स्थापना करण्यात आली यावेळी अध्यक्षपदी रेणुका भीमराव जोध, सुरेखा शिवाजी पवार सचिव पदी ,कोषाध्यक्षपदी सविता बाळू ठोंबरे, यांची निवड करण्यात आली.
जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार पंचायत समितीचे उपसभापती सुरेश ढोणे, यांच्या हस्ते करण्यात आला पंचायत समितीचे उमेद अभियानाची अधिकारीही व्ही एस फुले, विलास दुपारगुडे ,ग्राम विकास अधिकारी ,मेजर नरळे, महादेव चोखंडे, मलवा चौखंडे ,वंदना गैबी मोरे, सुग्राबी इस्माईल इनामदार, रेश्मा रावसाहेब माने ,मनीषा बाळू बनसोडे ,मीनाक्षी मारुती बनसोडे, महेश्वरी दिलीप महाडिक ,मलवा महादेव चौखंडे ,आदी उपस्थित होते.
यावेळी पंचायत समितीचे उमेद अभियानाचे प्रमुख अधिकारी विलास दुपारगुडे यांनी बचत गटाचे महत्त्व पटवून दिले या प्रभाग संघाच्या माध्यमातून भोसे जिल्हा परिषद गटातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून ज्या विविध योजना आहेत त्या समजावून सांगून अजून बचत गट निर्माण केले जाणार असल्याचे विलास दुपारगुडे यांनी सांगितले
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज