टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील श्रीक्षेत्र माचणूर येथील प्रसिद्ध श्री.सिध्देश्वर देवस्थानची पाच दिवसीय यात्रा महाशिवरात्री पासून सुरु होत असून आज पहाटे चार वाजता श्रींची शासकीय महापूजा तहसीलदार मदन जाधव तसेच उद्योजक संजय आवताडे यांच्या हस्ते करण्यात आली.
महाशिवरात्रीच्या पर्वावर दरवर्षी येथे महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटकातील लाखोंच्या संख्येने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी उसळते. या दिवशी सायंकाळी श्रींच्या पालखीचे माचणूर गावातून मंदिराकडे दिवट्या, टाळ- मृदंग, वाजंत्री, बेंजो पथकासह सवाद्य मिरवणुकीने प्रस्थान होणार असून कुस्ती मैदानात नयनरम्य आतषबाजी होणार आहे.
दुसऱ्या दिवशी रात्री सात ते सकाळी उजडेपर्यंत जिल्ह्यातील एकमेव राज्यस्तरीय कलगीतुरा कार्यक्रम मारुती मंदिर चौकात रंगणार आहे. या फडात पुणे, कोल्हापूर, धाराशिव, नाशिक, नगर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यातून नामांकित शाहीर आपली कला सादर करणार आहेत तसेच दामाजी शुगरचे चेअरमन शिवानंद पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.
तिसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता अखिल भारतीय सिध्देश्वर केसरी कुस्ती स्पर्धांचे उद्घाटन आ. समाधान आवताडे यांच्याहस्ते होणार असून अध्यक्षस्थानी आमदार प्रशांत परिचारक तर प्रमुख पाहुणे म्हणून सुभाषबापू देशमुख यांची उपस्थिती लाभणार आहे.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या मल्लास बुलेट मोटारसायकल आणि मानाची गदा बक्षीस मिळणार असून पुढील क्रमांकाच्या विजेत्यांना रु. ५१०००/-, २५०००/-, ११०००/- अशी पारितोषिके ठेवलेली आहेत.
शेवटच्या पाचव्या दिवशी सायंकाळी श्रींच्या पालखीचे सिध्देश्वर मंदिरातून माचणूर गावाकडे प्रस्थान होणार असून महाप्रसादाने यात्रेची सांगता होईल.
सर्व भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा तसेच सर्व उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन यात्रा कमिटीचे अध्यक्ष विलास डोके, सरपंच साधना डोके, उपसरपंच नितीन पाटील, सचिव समाधान डोके, संयोजक प्रकाश डोके, आयोजक राहुल डोके आदींनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज