टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे मृत्यू तांडव सुरूच असून आज पुन्हा 12 जणांचा बळी गेला आहे.तर 557 जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
आज एकूण 3 हजार 365 जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 2 हजार 805 जणांचा अहवाल निगेटिव्ह तर 557 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचबरोबर आज 340 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
आज आलेल्या अहवालानुसार आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या 19 हजार 305 एवढी झाली आहे. त्याचबरोबर 543 जणांना आतापर्यंत कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
अद्यापही रुग्णालयात 6 हजार 578 जण उपचार घेत असून कोरोनामुक्त होऊन 12 हजार 184 जण आपल्या घरी सुखरूप परतले आहेत.
आज ‘या’ गावात 12 जणांचा मृत्यू
उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथील 81 वर्षाचे पुरुष, कामती (ता. मोहोळ) येथील 34 वर्षांची महिला, कुंभार गल्ली पंढरपूर येथील 57 वर्षाची महिला, जेऊर )ता. करमाळा) येथील 90 वर्षाचे पुरुष, दर्गनहळ्ळी (ता. दक्षिण सोलापूर) येथील 55 वर्षाची महिला, बालाजी कॉलनी बार्शी येथील 67 वर्षांचे पुरुष, नातेपुते (ता. माळशिरस) येथील 60 वर्षाचे पुरुष,
तर सांगोला शहरातील शनी गल्ली येथील 63 वर्षाची महिला, उडनवाडी (ता. सांगोला) येथील 70 वर्षाची महिला, शेटफळ (ता. मोहोळ) येथील 67 वर्षाचे पुरुष, नाडी (ता. माढा) येथील 67 वर्षाची महिला तर जाधव प्लॉट माळशिरस येथील 85 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Maharashtra solapur rural new 557 corona positive patients Thursday 12 killed
???? राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज