टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहरात सोमवारी नव्या 88 रुग्णांची भर पडली असून आता एकूण रुग्णांची संख्या 3 हजार 337 झाली आहे. तर सोमवारी तिघांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या आता 306 झाली आहे.
मयत झालेल्यांमध्ये एक 60 वर्षीय तर एका 20 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर 55 वर्षीय पुरुषाचाही समावेश आहे.
सोमवारी भिम नगर (शेळगी), नर्मदा अर्पाटमेंट (रेल्वे लाईन), साई नगर (बाळे), यश नगर, पंचशिल नगर (कुमठा नाका), व्ही. एम. सोसायटी, कर्णिक नगर, विनायक नगर (एमआयडीसी), दोन क्र. झोपडपट्टी (हुच्चेश्वर मठाजवळ), मार्कंडेय नगर, मल्लिकार्जुन नगर (हत्तुरे वस्ती), काडादी चाळ, कुमठे, नवनाथ नगर, सिव्हिल कॉर्टर, न्यू पाच्छा पेठ, व्यंकटेश नगर (अक्कलकोट रोड), अशोक चौक, काडादी नगर, एनजी मिल चाळ, होमकर नगर, मंत्रि चंडक नगर, जयबजरंग नगर, विद्या नगर (उत्तर सदर बझार),
नाथ रेजन्सी, नर्मदा मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल, शासकीय दुधडेअरीजवळ, राधाकृष्ण कॉलनी, शुक्रवार पेठ (माणिक चौक) , वसंतराव नाईक नगर, आशियाना नगर, सैफूल, नेहरु नगर, सोनी नगर, कोणार्क नगर, सोरेगाव (विजयपूर रोड), सहारा नगर, विवेकानंद नगर, अंत्रोळीकर नगर (होटगी रोड), लष्कर, लक्ष्मी मार्केट रोड (दक्षिण कसबा), केगाव, संगमेश्वर नगर (अक्कलकोट रोड), कल्याण नगर, भवानी पेठ, देशमुख-पाटील वस्ती, न्यू गणपती मंदिराजवळ, भाग्यश्री पार्क, भारतमाता नगर (मजरेवाडी), न्यू बुधवार पेठ, मंगल रेजेन्सी, गुरुदेव दत्त नगर भाग क्र.एक, इंडियन मॉडेल शाळेजवळ, ज्ञानेश्वर नगर(जुळे सोलापूर), बुधवार पेठ, गिताधाम अर्पाटमेंट (दयानंद कॉलेजवळ), मडकी वस्ती, जम्मा वस्ती, उत्तर कसबा, वारद फार्म, अरिहंत पार्क (बुधवार पेठ), बनशंकरी नगर याठिकाणी नवे रुग्ण आज सापडले आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज