मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने महिलांना मोठा दिलासा दिला. गेल्या वर्षभरात त्यांच्या खात्यात 18 हजारांची रक्कम जमा झाली आहे.
या योजनेतंर्गत 1500 रुपये दरमहा पात्र महिलांच्या खात्यात जमा होतात. पण गेल्या काही महिन्यात या योजनेत अनेक घुसखोर घुसल्याचे समोर आले. काही पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले.
तर सरकारी कर्मचारी महिलांनी योजनेत हात धुवून घेतल्याचे समोर आले. योजनेला विविध निकष लावण्यात आले आहेत.
या योजनेला लागलेली घुसखोरीची कीड दूर करण्यासाठी आता ई-केवायसीची (e-KYC) सक्ती करण्यात आली आहे. ई-केवायसीसाठी कोणकोणती कागदपत्रं आवश्यक आहे, हे समजून घ्या.
कोण-कोणती कागदपत्रं आवश्यक?
लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी खालील कागदपत्रं असणं गरजेचे आहे.
आधार कार्ड
पासरपोर्ट साईज फोटो
रहिवाशी दाखला, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र
उत्पन्नाचा दाखला
बँक खात्याची सविस्तर माहिती
नमूद केलेली इतर कागदपत्रं
eKYC करण्याची प्रक्रिया
सरकारचे या योजनेसाठी स्वतंत्र संकेतस्थळ ladakibahin.maharashtra.gov.in आहे. यावर अथवा ई महासेवा केंद्रावर महिलांना ईकेवायसी पूर्ण करता येणार
अशी करा प्रक्रिया पूर्ण
साईटवर जा. ई-केवायसीवर क्लिक करा
नाव, पत्ता, रेशन कार्ड क्रमांक, उत्पन्नाची माहिती आणि आधार क्रमांक नोंदवा
मागितलेली कागदपत्रं अपलोड करा. सबमिट करा. त्यानंतर कागदपत्रं जमा झाल्याची खात्री करा
दोन महिन्यात पूर्ण करा ई-केवायसी
लाडकी बहीण योजनेविषयी सरकार दरबारी नवीन निर्णय घेण्यात आला आहे. आता प्रत्येक लाभार्थी महिलांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याविषयीची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
अर्थात ई-केवायसी करण्यासाठी सरकारने मोठी मुदत दिली आहे. कारण आता सणासुदीचे दिवस आहेत. महिलांवरील कामाचा ताण पाहता केवायसी प्रक्रियेसाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.
लाडक्या बहिणींना 1 लाखांचं बिनव्याजी कर्ज
लाडकी बहीण योजनेत 1 लाखांपर्यंतचे कर्ज शुन्य टक्के व्याजदराने देण्यात येत आहे. सध्या योजना मुंबई शहर आणि उपनगरामध्ये लागू आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये लवकरच योजना लागू होऊ शकते. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक महिलांना त्यांचा उद्योग व्यवसाय सुरु करता येणार आहे.
सध्या मुंबई बँकेने 3 सप्टेंबरपासून ही योजना लाडक्या बहिणींसाठी कर्ज पुरवठा सुरू केला आहे. मुंबईसह आजुबाजूच्या लाडक्या बहिणींना त्याचा फायदा होणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज