टीम मंगळवेढा टाईम्स ।
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात भक्तीचा महापूर उसळला आहे. या भक्तीमय वातावरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठूरायाची महापूजा केली.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, आमदार समाधान आवताडे यांच्यासह अनेक मंत्री-खासदार उपस्थित आहेत.
भरपूर पाऊस पडू दे आणि शेतकरी सुखी-समाधानी राहू दे असं साकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पांडुरंगाला पूजेदरम्यान घातले.
आषाढी एकादशीनिमित्त यंदा विठ्ठल-रखुमाईच्या शासकीय पुजेचा मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाला. त्यांच्या सोबतच नाशिक जिल्ह्यातील बाळू शंकर अहिरे व आशा बाळू अहिरे या वारकरी दाम्पत्याला शासकीय महापूजेसाठी उपस्थित राहण्याचा मान मिळाला.
अहिरे दाम्पत्य हे नाशिक जिल्ह्यातील अंबासन येथील रहिवासी आहे. हे दाम्पत्य गेल्या 16 वर्षांपासून अखंडपणे पंढरपूरच्या वारीत सहभागी होत वारी करत आहेत.
दरम्यान, आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात भविकांची मांदियाळी बघावयास मिळत आहे. जवळपास 15 लाख भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपुरा दाखल झाले आहेत. चंद्रभागेच्या तिरावर स्नानासाठी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी झाली आहे.
पाऊस आणि शेतकरी सुखासाठी मुख्यमंत्र्यांचे विठूरायाला साकडे
दरम्यान, राज्यात भरपूर पाऊस पाणी पडत शेतकरी सुखी-समाधानी राहू दे. राज्याती सर्व क्षेत्राची प्रगती होत प्रगतीला अधीक चालना मिळवी, असं साकडं आपण पंढरपूरच्या पांडुरंगाला घातल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
परंपरेनुसार, मुख्यमंत्री शिंदे यांनी सपत्नीक विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा केली. पहाटे अडीच वाजेपासून या शासकीय पूजेला सुरुवात झाली होती.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज