टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील श्रीराम मंगल कार्यालयात आज सायंकाळी ५ ते रात्री ८ पर्यंत तिळगुळ व हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आल्या असल्याची माहिती श्रीराम फाउंडेशनच्या कार्याध्यक्षा सौ.सुप्रिया अजित जगताप यांनी दिली आहे.
सदर समारंभ प्रसंगी प्रमुख आकर्षण म्हणून तुझ्यात जीव रंगला टीव्ही मालिकेच्या प्रमुख अभिनेत्री तसेच अप्सरा आली विजेती डान्स-शो मधील मुख्य कलाकार अभिनेत्री माधुरी पवार या उपस्थित राहणार आहेत.
मंगळवेढा शहरातील महिलांसाठी हा कार्यक्रम कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.तिळगुळ व हळदीकुंकू कार्यक्रमाप्रसंगी महिलांना अभिनेत्री माधुरी पवार सोबत मनमोकळ्या गप्पा मारायला मिळणार आहेत.
तरी शहरातील महिलांनी या कार्यक्रमात सहभागी होवून आनंद लुटावा असे आवाहन माजी उपनगराध्यक्षा आशादेवी रामचंद्र जगताप यांनी केले आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9970 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9970 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज