mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अवकाळीचा वादळी मारा सोसण्यासाठी तयार राहा! हवामान विभागाकडून नकोसा इशारा जारी…, पुढचे ‘इतके’ दिवस पाऊस घालणार धुमाकूळ; ‘हा’ नेमका कोणता ऋतू सुरू आहे?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 28, 2025
in राज्य, सोलापूर
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।

ऑक्टोबर महिन्यामध्ये एकाएकी तापमानवाढ झाली आणि या तापमानवाढीनं नागरिक बेजार झाले. इथं ही परिस्थिती असतानाच दुसरीकडे राज्याच्या बहुतांश भागांमध्ये वादळी पावसानं हजेरी लावल्यानं हा नेमका कोणता ऋतू सुरू आहे हाच प्रश्न आता अनेकांच्या मनात घर करु लागला आहे.

प्रत्यक्षात मान्सूननं राज्यातूनच नव्हे तर देशातूनही माघार घेतली असली तरीही बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण निर्मिती होताना दिसत आहे. ज्या धर्तीवर प्रामुख्यानं विदर्भ आणि नजीकच्या भागांसाठी पावसाचा यलो अलर्ज जारी करण्यात आला आहे.

सोलापूरपासून मुंबईपर्यंत पाऊसमारा…

प्रामुख्यानं पूर्व-मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं परिणामस्वरुप सोलापूर, मुंबईसह कोकणात येत्या पुढील 4 दिवस अर्थात 30 ऑक्टोबरपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या इशाऱ्याच्या धर्तीवर राज्याच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहणार असून त्यांचा वेग ताशी 40 ते 50 किमी इतका असल्याचं सांगण्यात येत आहे. मराठवाड्यात पुढचे तीन दिवस पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तर, रायगड जिल्ह्यात पावसामुळे नागरिकासह शेतकऱ्यांपुढंही अनेक अडचणी उभ्या राहिल्याचं पाहायला मिळत आहे. रायगडसह संपूर्ण कोकणात पुढच्या चार दिवसांसाठी पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

दरम्यान हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर शेतकऱ्यांनी कापणीची कामंही थांबवल्याचं चित्र आहे. फक्त शेतकरीच नव्हे तर, मासेमारांनासुद्धा खोल समुद्रात न जाण्याचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यातील समुद्रकिनाऱ्यावर वाऱ्यांची दिशा पाहता सर्व मासेमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभाग अर्थात आयएमडीच्या इशाऱ्यानुसार, पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं वाय़ऱ्याचा वेग 29 ऑक्टोबरपर्यंत 35 ते 45 किमी ताशी इतका असेल. हा वेग अगदी 55 किमी ताशीपर्यंतही जाऊ शकतो.

ज्यामुळं मासेमारांना समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. अरबी समुद्रातील कमी दाबाचं क्षेत्र पुढच्या 24 तासांमध्ये किनारपट्टीजवळून पुढे सरकणार असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण तुलनेनं अधिक असेल. तर हा पाऊस नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुक्कामी असण्याचा प्राथमिक अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रात मात्र हवामान कोरडं राहण्याचा अंदाज आहे.

वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

हवामान विभागाच्या माहितीनुसार, कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सोमवारी दुपारनंतर सोलापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे हलक्या सरी कोसळल्या. काही तालुक्यातही पाऊस पडला.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सोलापूर जिल्हा अवकाळी पाऊस

संबंधित बातम्या

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

March 19, 2026
शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

March 19, 2026
वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

March 19, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

​पोलिसांचा आशीर्वाद की यंत्रणेचा सुस्तपणा? गुन्हा दाखल असलेले ‘ते’ १० विद्यार्थी अजूनही मोकाटच; मनसेचा पोलीस महानिरीक्षकांना सवाल

March 18, 2026
दक्षिण भागात म्हैसाळचे पाणी “टेल टू हेड” मिळणेसाठी आ.आवताडे यांची विधानसभेत मागणी; देवेंद्र फडणवीस यांचे सकारात्मक उत्तर

नदी वाचवा, निधी द्या! भीमेच्या शुद्धीकरणासाठी १०० कोटी द्या; आमदार आवताडेंची सरकारकडे आग्रही मागणी; विधानसभेत घुमवला आवाज

March 17, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! ​गरीबांच्या हक्काच्या पैशावर डल्ला; लाचखोर ग्रामपंचायत कर्मचारी अटकेत

March 17, 2026
कामाची बातमी! मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया उपचार सुरू

मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य आरोग्य शिबीर: मोफत तपासणी आणि उपचारांची सुवर्णसंधी

March 17, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! सोलापूर जिल्ह्यातील शाळांचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेपासून सुरू होणार सुट्ट्या

March 17, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

ब्रेकिंग! सोलापूर झेडपी अध्यक्षपदाचा पेच सुटणार? पालकमंत्र्यांकडे सर्वांच्या नजरा; ‘ही’ नावे आहेत सर्वात पुढे

March 16, 2026
Next Post
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

भयानक! अज्ञात वाहनाच्या धडकेत मंगळवेढ्यातील अभियांत्रिकी विद्यार्थी ठार; गंभीर जखमी होऊन हात तुटून बाजूला; आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा; कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

ताज्या बातम्या

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

March 19, 2026
शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

March 19, 2026
वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

March 19, 2026
राजमाता अर्बन बँक रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; दामाजी चौकात बँकेची 24 तास ATM सेवा सुरू

मंगळवेढ्यात ‘राजमाता बँकेचा’ उद्या वर्धापनदिन; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चहापानाचे आयोजन

March 18, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

​पोलिसांचा आशीर्वाद की यंत्रणेचा सुस्तपणा? गुन्हा दाखल असलेले ‘ते’ १० विद्यार्थी अजूनही मोकाटच; मनसेचा पोलीस महानिरीक्षकांना सवाल

March 18, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढा हादरलं! चाकूचा धाक दाखवून भरवस्तीत घरफोडी; सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

March 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..