भाजपचे जेष्ठ नेते असलेले एकनाथ खडसे यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला त्यानंतर उद्या शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची त्यानी घोषणा केली मात्र प्रवेश करण्या अगोदरच त्यांच्यावर आरोप होण्यास सुरुवात झाली आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसे विरोधात गंभीर आरोप केले आहेत. एकनाथ खडसे यांनी जेवढा माझा छळ केला, तेवढा कोणी केला नसेल असे गंभीर आरोप केला आहे.
त्या पुढे म्हणाल्या, यापुढे कोणत्याही पत्रकार परिषदेत त्यांनी माझं नाव घेतलं तर याद राखा, तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिला.
एकनाथ खडसे यांच्याविरोधील विनयभंगाचा खटला संपलेला नसल्याचं स्पष्ट केलं. खडसे हे वेगळ्या प्रवृत्तीने नेते आहेत. त्यांनी माझा अतोनात छळ केला आहे. 3 सप्टेंबर रोजी वाढदिवसाच्या दिवशी झालेल्या सभेत माझ्याबद्दल अश्लिल वक्तव्य केले होते. त्याचे व्हिडिओ आणि ऑडिओ हे माझ्याकडे आले.
त्याचे हे व्हिडिओ मी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले होते. त्यावेळी पोलिसांनी 501 कलमाखाली गुन्हा दाखल केला होता. ते अत्यंत खालच्या स्तराला जाऊन बोलले होते, असा खुलासा दमानिया यांनी केला होता.
देवेंद्र फडणवीस यांना फक्त सोईचे राजकारण करायचे होते. नेहमी सामाजिक कार्यकर्त्यांबद्दल अशा प्रकारचे राजकारण करण्यात आले होते, अशी टीकाही दमानिया यांनी फडणवीस यांच्यावर केली.
खडसे म्हणाले की, मी खोट्या तक्रारीबद्दल फडणवीस यांना विचारले असता, त्यांनी दमानिया या गोंधळ घालत होत्या म्हणून असा गुन्हा दाखल करण्यात आला होता असं सांगितलं.
मी, फडणवीस यांना विचारू इच्छीत जर खडसे यांनी अमृता फडणवीस यांच्याबद्दल असे वक्तव्य केले असते, तर तुम्ही असंच बोलला असता का? असा सवालही दमानिया यांनी केला.
खडसे यांच्याबद्दलचा खटला अजून संपलेला नाही. त्यांनी जर पुढे कोणत्याही पत्रकार परिषदेत माझ्याबद्दल काहीही वक्तव्य केले तर मी तुम्हाला सोडणार नाही, असा इशाराही दमानियांनी दिला.(tv9)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज