टीम मंगळवेढा टाईम्स।
भारतीय संघाविरुद्ध खेळताना ट्रेविस हेडची बॅट चांगलीच तळपते. ऑस्ट्रेलियाचे फलंदाज एकापाठोपाठ एक माघारी जातात, मात्र ट्रेविस हेड शेवटपर्यंत टिकून राहतो. असंच काहीसं चित्र भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सुपर ८ च्या सामन्यात पाहायला मिळालं.
सेमिफायनलमध्ये जाण्यासाठी अतिशय महत्वाच्या असलेल्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर २०६ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना हेडने पूर्ण जोर लावला.
मात्र यावेळी बाजी भारतीय गोलंदाजांनी मारली आणि ऑस्ट्रेलियाचा २४ धावांनी पराभव केला. यासह भारतीय संघाने सेमिफायनलमध्ये प्रवेश केला आहे.
ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी २०६ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नरच्या रुपात पहिला धक्का बसला. त्यानंतर हेडने संघाचा डाव सांभाळला.
कर्णधार मिचेल मार्शने ३७ धावा केल्या. तर ग्लेन मॅक्सवेल २० धावा करत माघारी परतला. हेडने पुन्हा एकदा भारतीय संघाची डोकेदुखी वाढवली होती. मात्र शेवटी जसप्रीत बुमराहने त्याला ७६ धावांनी बाद करत माघारी धाडलं.
या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकला आणि भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिल. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना विराट कोहली आणि रोहित शर्मा ची जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी आहे.
मात्र विराट कोहली या सामन्यातही फ्लॉप ठरला. तो ५ चेंडू खेळून शून्यावर माघारी परतला. मात्र रोहित शर्माने पहिल्या चेंडूपासूनच ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. त्याने मिचेल स्टार्कवर हल्लाबोल करत एकाच षटकात २८ धावा चोपल्या.
यादरम्यान त्याने टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० षटकार पूर्ण केले. त्याला वेगवान शतक झळकावण्याची संधी होती. मात्र तो ४१ चेंडूत ९२ धावा करत माघारी परतला. त्यानंतर रिषभ पंतने १५, सूर्यकुमार यादवने ३१ धावा केल्या.
शेवटी शिवम दुबेने २२ चेंडूंचा सामना करत २८ धावांची खेळी केली. तर हार्दिक पंड्याने १७ चेंडूंचा सामना करत महत्वपूर्ण २७ धावा चोपल्या.
भारतीय संघाने दमदार सुरुवात केली होती. मात्र शेवट गोड करता आला नाही. भारतीय संघाला २० षटकअखेर ५ गडी बाद २०५ धावा करता आल्या.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज