टीम मंगळवेढा टाईम्स ।
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यात चार दिवसांत सुरुवात होईल. मात्र अद्याप महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा आणि उमेदवारीचा घोळ मिटलेला नाही. त्यामुळे भाजप आणि मनसेचे उमेदवार निश्चित झालेले असताना महाविकास आघाडीकडून कुणाला उमेदवारी मिळते, याबाबत मंगळवेढा व पंढरपूरकरांची उत्कंठा ताणलेली आहे.
दरम्यान, भाजपचे नेते प्रशांत परिचारक, अनिल सावंत, वसंतनाना देशमुख व भगीरथ भालके यांनी तुतारी मिळवण्यासाठी प्रतिष्ठा पणास लावल्याचे दिसते. तुतारी कोणाच्या हाती मिळणार? यावर पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अवलंबून आहे.
पंढरपूर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने विद्यमान आमदार समाधान आवताडे यांची उमेदवारी जवळपास निश्चित केलेली आहे. मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर करून त्यांनी प्रचारही सुरु केलेला आहे.
तर भाजपचे नेते माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या कार्यकत्यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केलेली असली तरी प्रत्यक्षात परिचारक यांची मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडे (शरदचंद्र पवार) उमेदवारीसाठी चाचपणी सुरू असल्याचे दिसते आहे.
परिचारकांच्या शिष्टमंडळाने खासदार शरद पवारांची अनेकदा भेट घेऊन उमेदवारीची मागणी केलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार व बिआरएस पक्षाचे भगीरथ भालके यांनी पुन्हा आपला मोर्चा राष्ट्रवादीकडे वळवला आहे.
तुतारी हे चिन्ह मिळावे, यासाठी त्यांनी सर्व पातळीवर प्रयत्न चालवले आहेत. त्यामुळे उमेदवारी उमेदवारी कोणास मिळते? हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
महाविकास आघाडीकडून भगिरथ भालके, प्रशांत परिचारक यांच्यासह अनिल सावंत यांचेही प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये कोणाच्या हाती तुतारी मिळते याकडे लक्ष लागले आहे.
अनिल सावंतांनी मतदारसंघ काढला पिंजून, भालके यांनी काढली जनआशीर्वाद यात्रा, परिचारकांचा बैठकांतून कार्यकर्त्यांशी संवाद
अनिल सावंत यांनी होम मिनिस्टर या खेळाच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे तर भालकेंची जनआशीर्वाद यात्रा व परिचारकांच्या संवाद बैठका महाविकास आघाडीमधून पंढरपूरची जागा मिळवण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र एकूण राजकीय परिस्थिती पाहता पंढरपूरची पारंपरिक जागा राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नसल्याचे दिसून येते.
त्यामुळे या मतदारसंघात तुतारी घेऊन लढण्यासाठी सावंत, भालके आणि परिचारक प्रयत्नशील आहेत. भगीरथ भालके यांनी जनआशीर्वाद यात्रा काढली. तर परिचारक यांनी भाजपने देऊ केलेले महामंडळ अध्यक्षपद नाकारून संपूर्ण मतदार संघात संवाद बैठका घेतल्या.
मतदारसंघाचा घेतला आढावा
शरद पवार व खा. सुप्रिया सुळे यांनी मंगळवेढा पंढरपूर मतदार संघाचा आढावा जाणून घेतला आहे. राहुल शहा, कार्याध्यक्ष संतोष रंदवे, चंद्रशेखर कोंडूभैरी, प्रथमेश पाटील यांनी मतदारसंघातील अडीअडचणी व कोण उमेदवार दिला पाहिजे याची माहिती दिली आहे
मोहिते-पाटील हेच ठरतील निर्णायक
या मतदारसंघात उमेदवारी देताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने मोहिते-पाटील यांना विश्वासात घेण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी बारामतीबरोबरच अकलूजकडेही मोर्चेबांधणी चालवली आहे. मोहिते-पाटलांच्या गाठी-भेटी घेण्यावर भर दिल्याचे दिसते.
मंगळवेढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून तुमची पसंती कोणाला असेल?
1) समाधान आवताडे. 2) प्रशांत परिचारक. 3) अनिल सावंत.
4) दिलीप धोत्रे. 5) भगीरथ भालके. 6) इतर उमेदवार
यासंदर्भात नागरिकांनी 9970766262 या व्हाट्सअप नंबर वरती आपण आपला पसंती क्रमांक नोंदवावा.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज