मंगळवेढा टाईम्स न्युज ।
कर्जाच्या वसुलीपोटी दिलेला चेक न वटल्या प्रकरणी ९ वे अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी, सांगली यांच्या न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय देत कर्जदारास दोषी ठरवून एक वर्षांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

तसेच फिर्यादी पतसंस्थेला नुकसानभरपाई म्हणून ७,४५,८१९ रक्कम दोन महिन्यांच्या आत भरण्याचे निर्देश दिले असून,

रक्कम न भरल्यास अतिरिक्त तीन महिन्यांच्या कारावासाची तरतूद केली आहे.

सविस्तर वृत्त असे की जयकुम ार श्रीपती गवंडी, रा. मजरेवाडी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर यांनी लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेकडून

घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी ५,४५,००० रकमेचा धनादेश संस्थेकडे दिला होता.

सदर धनादेश बँकेत सादर केल्यावर Funds Insufficient या कारणावरून तो न वटल्याचे न्यायालयासमोर सिद्ध झाले.

हे प्रकरण संक्षिप्त फौजदारी खटला क्र. १८५८/२०२३ (CNR No. MHSN०३००३११०२०२२) अंतर्गत दाखल करण्यात आले होते.

सुनावणीत आरोपीचा चेक अनादर झाल्याचे स्पष्टपणे निष्पन्न झाल्यामुळे माननीय न्यायालयाने आरोपीस चलनविषयक कायदा कलम १३८ तसेच दंड प्रक्रिया संहिता कलम २५५ (२) अंतर्गत दोषी ठरवून शिक्षा एक वर्षाच्या साधा कारावास व दोन महिन्याच्या आत ७,४५,८१९ रुपये भरण्याची शिक्षा ठोठावली आहे.

या निर्णयामुळे पतसंस्थांच्या कर्ज वसुलीपोटी खात्यावर बॅलन्स नसतानाही चेक देणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत तसेच सभासदांच्या ठेवींचे संरक्षण आणि संस्थेची विश्वासार्हता कायम राखण्यासाठी अशा प्रकारच्या थकबाकीदारांविरोधात कायदेशीर चौकटीत कठोर पावले उचलण्याचा संस्थेचा निर्धार यामुळे अधिक दृढ झाला आहे.

कर्जदार व सभासदांनी कर्जाची परतफेड वेळेत करून कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन लोकमंगल पतसंस्थेच्या प्रशासनाकडून केले आहे. पतसंस्थेच्या वतीने अॅड. एस.एस. संकपाळ तर आरोपीच्या वतीने अॅड.डी.एम. वठारे यांनी काम पाहिले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












