mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

राज्यातील इतर 22 जिल्हे सुरू; मग सोलापूर बंद का? निर्णय न झाल्यास दुकाने उघडणार; व्यापाऱ्यांनी दिला इशारा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 2, 2021
in सोलापूर, राज्य
महाराष्ट्रात कडक निर्बंधांबाबत ‘या’ तारखेनंतर घोषणा होण्याची शक्यता?

टीम मंगळवेढा टाईम्स ।

नियमावलीत बसत नसतानादेखील राज्यातील 22 जिल्ह्यांत लॉकडाऊन नियमांत शिथिलता देण्यात आली. तेथे सर्व व्यापार सुरू होतात; मग सोलापूर शहर बंद का, असा प्रश्‍न करीत व्यापार्‍यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी भेट न दिल्याने त्यांनी सहाय्यक आयुक्‍तांना गराडा घातला. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनाही गाठून गार्‍हाणे मांडले. त्यानंतरही निर्णय न झाल्याबद्दल व्यापार्‍यांचा संताप अनावर झाला.

त्यांनी आयुक्‍तांनी व्यापारी व कामगारांना वेठीस धरल्याचा आरोप करीत त्यांची राज्य शासनाकडे तक्रार केली.

सोलापूर शहर हे कामगारांचे शहर असल्याने यंत्रमाग, विडी उद्योगासह इतर व्यापारी संकुले सुरू करण्याची मागणी विविध संघटनांनी राज्य शासनाकडे केली होती.

यावर शासनाने 1 जूनपासून शहर टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्याचे आश्‍वासन दिले होते. या आश्‍वासनाचे पालन न केल्याने व्यापारी आंदोलनाच्या पावित्र्यात होते. मंगळवारपासून व्यापारी एकेरी लाईन पद्धतीने (सम-विषम) आलटून-पालटून व्यवसायास परवानगी देण्याची आशा बाळगून होते.

शासनाकडूनही तसा ग्रीन सिग्नल मिळण्याचे संकेत दिले होते. त्यादृष्टीने मंगळवारी दुकाने सुरू करण्याची तयारीही केली होती.

मात्र जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात 15 जूनपर्यंत लॉकडाऊनचे निकष कायम ठेवले. दुसरीकडे मनपा प्रशासनाने पुन्हा 15 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम करण्याचा आदेश मध्यरात्री काढला. त्याचबरोबर पोलिस प्रशासनानेही आंदोलनाची परवानगी नाकारली.

त्यामुळे शहरातील संतप्त व्यापार्‍यांनी मंगळवारी महापालिकेत सहा. आयुक्‍तांना जाब विचारात गराडा घातला. यावेळी माजी आ. दिलीप माने, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, नगरसेवक आनंद चंदनशिवे, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी केतन शहा, हर्षल कोठारी, जितू राठी, खुशाल देढिया आदी उपस्थित होते.

सोलापूर शहरात 50 टक्के बेड शिल्लक आहेत. लोकसंख्या 10 लाखांच्या वर आहे. मृत्यूदर, बाधितांचा दरही कमी आहे. तरीही सोलापूर शहरात लॉकडाऊन कशासाठी? शासनाच्या नियमांत बसत नसतानादेखील इतर 22 जिल्हे कसे सुरू केले?, मग सोलापरूवर अन्याय का, असा पवित्रा घेतला.

व्यापारी म्हणाले, जिल्ह्याची एकंदरीत परिस्थिती पाहता जिल्हा रेड झोनमध्ये आहे. मात्र शहर ग्रीन झोनमध्ये आहे. शहर टप्प्या-टप्प्याने अनलॉक करावे. स्थानिक स्तरावर निर्णय घेण्याचा अधिकारी आयुक्‍तांना आहे. त्यामुळे आम्ही आयुक्‍तांकडे गेल्या आठ-दहा दिवसांपासून पाठपुरावा करीत होतो.

जिल्हाधिकार्‍यानांही त्याबाबत कळविले. पण त्यांनी आयुक्‍तांकडे पाठविले. आजही आयुक्‍त भेटले नाहीत. आता शहरात पूर्णत: कोरोना नियंत्रणात असूनही ते जबाबदारी झटकत आहेत.

सक्षम निर्णय घेण्यात कमी पडत आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी ग्रामीणसाठी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी शहरात करीत आहेत. यासंदर्भात चेंबर ऑफ कॉमर्स, नवी पेठ व्यापारी संकुल, पार्क स्टेडिअम व्यापार्‍यांनी आयुक्‍तांची राज्य शासनाकडे तक्रार केली आहे.

तुम्ही प्रस्ताव पाठवा, मी आदेश काढायला सांगतो

व्यापारी असोसिएशनच्या मागण्यांसाठी माजी आमदार दिलीप माने यांनी पी. शिवशंकर यांची भेट घेतली. मात्र त्यांनी तांत्रिक कारण सांगत निर्बंध शिथील करण्यास नकार दिला. यावर तुम्ही शासनाकडे प्रस्ताव पाठवा, मी शासनाकडे पाठपुरावा करून आदेश काढायला सांगतो, असे सांगून ते कार्यालयातून बाहेर पडले.

निर्णय न झाल्यास दुकाने उघडणार : व्यापारी

गेल्या दीड महिन्यांपासून लॉकडाऊनने आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे व्यापारी हैराण झाले आहेत. राज्य शासन व प्रशासकीय स्तरावर शहर अनलॉकबाबत निर्णय घेण्यात आला नाही, तर आम्ही सर्व व्यापारी विनापरवानगी दुकाने उघडणार. यातून काही घडल्यास याला राज्य शासनासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा जबाबदार राहील, अशी भूमिका व्यापार्‍यांनी घेतली.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Solapur

संबंधित बातम्या

आमदार शहाजी पाटील यांच्या एंन्ट्रीने युवा महोत्सवाला आली रंगत, खास शैलीत विद्यार्थ्यांशी साधला संवाद; म्हणाले…

अघोरी पूजेचा पर्दाफाश! माझ्या भाच्याला जीवे मारण्यासाठी उघडे-नागडे होऊन पूजा केली;  सांगोल्यात शहाजीबापूंचा अंगावर काटा आणणारा आरोप

September 5, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा

September 5, 2026
मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

चिंताजनक! राज्यात ‘या’ रोगाचा शिरकाव, 37 रुग्णांना लागण, सणासुदीच्या तोंडावर प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन; लक्षणे आणि उपचार?

September 5, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! माजी सैनिकानं आधी बायकोला संपवलं; मुलावरही जीवघेणा हल्ला; मग स्वतः भीमा नदीकाठी गळ्याला दोर लावला

September 3, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

सावधान! नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; पॅकेटवरील एक्स्पायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री, 11 कंपन्यांविरुद्ध कारवाई

September 2, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मोबाईलवरील ई-पीक पाहणीची डोकेदुखी मिटली; महसूल यंत्रणेवर जबाबदारी

September 1, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

दारूचे व्यसन ठरले आईच्या जीवावर; पैसे न दिल्याने पोटच्या मुलाने आईला संपवले, आरोपी गजाआड

September 1, 2026

जमीन मालकांसाठी मोठी खूशखबर! वारंवार मोजणीच्या त्रासातून अन् खर्चातून मुक्तता; शासकीय कार्यालयांमध्ये पुन्हा मोजणीची अट रद्द

August 31, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

राखी पौर्णिमेच्या दिवशीच काळाचा घाला: बहिणीकडे राखी बांधण्यासाठी गेलेल्या भावाचा भीषण अपघातात मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावावर शोककळा

August 29, 2026
Next Post
मंगळवेढ्यातील कोरोना रुग्णांची लूट थांबवण्यासाठी प्रशासन कोणती पावलं उचलणार?

नागरिकांनो! कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी दर जाहीर; ठाकरे सरकारचा खासगी हॉस्पिटल्सना दणका

ताज्या बातम्या

आमदार शहाजी पाटील यांच्या एंन्ट्रीने युवा महोत्सवाला आली रंगत, खास शैलीत विद्यार्थ्यांशी साधला संवाद; म्हणाले…

अघोरी पूजेचा पर्दाफाश! माझ्या भाच्याला जीवे मारण्यासाठी उघडे-नागडे होऊन पूजा केली;  सांगोल्यात शहाजीबापूंचा अंगावर काटा आणणारा आरोप

September 5, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा

September 5, 2026
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

September 4, 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्या निमित्ताने आज मंगळवेढ्यात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन; झी टॉकीज फेम बाल कीर्तनकारचे होणार कीर्तन

मंगळवेढ्यात आज रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी जन्मोत्सव सोहळा थाटात संपन्न होणार; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

September 4, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ उद्या मंगळवेढा तालुका १००% बंद; सकल मराठा समाज आक्रमक, प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन

September 3, 2026
मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

चिंताजनक! राज्यात ‘या’ रोगाचा शिरकाव, 37 रुग्णांना लागण, सणासुदीच्या तोंडावर प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन; लक्षणे आणि उपचार?

September 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा