टीम मंगळवेढा टाईम्स । करोनाचा फैलाव वाढत असल्याने सांगली जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडलेल्या बैठकीत जिल्ह्यात २२ ते ३० जुलै दरम्यान लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. ग्रामपंचायत वगळता पूर्ण सांगली जिल्ह्यात पुन्हा लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे ३० जुलैपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार राहणार बंद राहणार आहेत. Lockdown again in Sangli district, all transactions closed till July 30
जयंत पाटील यांनी याआधीच सांगली जिल्ह्यातही करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असण्यावरुन चिंता व्यक्त करत सांगलीकरांना लॉकडाउनचा इशारा दिला होता. काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करणारं ट्विट केलं होतं.
गेल्या काही दिवसात सांगली जिल्ह्यात करोनाचे रुग्ण वाढत आहे. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. मी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. प्रशासन सर्व खबरदारी घेत आहे. जनतेने आरोग्याची काळजी घ्यावी. आपण गर्दीत जाऊ नका, गर्दी करू नका, सोशल डिस्टनसिंगचे पालन करा ही नम्र विनंती असं आवाहन त्यांनी केलं होतं.
परिस्थिती जर नियंत्रणात आली नाही, तर आम्हाला नाईलाजाने पुन्हा लॉकडाऊनची घोषणा करावी लागेल. त्याने कारखाने बंद होतील. रोजगार जाईल. ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांची अडचण होईल. आर्थिक फटका बसेल. त्यामुळे प्रशासनाला सहकार्य करा, नियमांचे पालन करा, काळजी घ्या. अशी विनंतीही जयंत पाटील यांनी केली होती. पण अखेर सोमवारी पार पडलेल्या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी लॉकडाउनची घोषणा केली आहे. हा लॉकडाउन महानरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतमध्ये लागू होणार आहे.
—————————
???? राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज