मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । देशभरात कोरोनाचा (Coronavirus) कहर दिवसेंदिवस वाढत आहे. यादरम्याम शनिवारी बहराइत येथे क्वारंटाइन संपताच 17 तबलिगींनी तुरुंगात पाठविण्यात आले आहे. बहराइच पोलिसांनी शहरातील ताज आणि करैश मशिदीतून इंडोनेशिया आणि थायलँड येथील 17 परदेशी नागरिकांसह 21 तबलिंगींनी पकडलं आहे.
ते गेल्या 14 दिवसांपासून क्वारंटाइनमध्ये होते. क्वारंटाइन संपताच त्या सर्वांना मॅजिस्ट्रेट समोर नेण्यात आले. पैकी 17 परदेशीत व्हिसा आणि पासपोर्ट नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी मानून तुरुंगात पाठविण्यात आले आहे. यांची कोविड – 19 रिपोर्ट निगेटिव्ह आली आहे. अन्य 7 भारतीयांचीदेखील तुरुंगात रवानगी करण्यात आली.
बहराइचचे पोलीस अधीक्षक बिपीन मिश्रा यांनी सांगितले की, तबलिगी जमातच्या 21 सदस्यांना अटक करण्यात आली आहे. हे लोक आपली ओळख लपवून राहत होते. यामध्ये इंडोनेशियाचे 10, थायलँडचे 7 आणि 4 सहभागी आहेत. त्यांच्याविरोधात दिल्ली येथील निजामुद्दीनमधील आयोजित तबलिगी जमातच्या मरकज येथून परतल्यानंतर लपल्याच्या आरोपाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज