टीम मंगळवेढा टाईम्स।
ब्लॉक अध्यक्षांच्या निवडीवरून जिल्हा काँग्रेसमधील वातावरण तापले आहे. नव्या ब्लॉक अध्यक्षांच्या निवडी तालुकाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेत्यांना डावलून झाल्या आहेत. या विरुद्ध पक्षाकडे तक्रार केल्याचे काँग्रेसचे मंगळवेढ्याचे माजी तालुकाध्यक्ष अॅड. नंदकुमार पवार यांनी सांगितले अशी बातमी लोकमतने प्रसिद्ध केली आहे.
काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांनी नुकतेच शहर आणि जिल्ह्यातील ब्लॉक अध्यक्षांची नावे जाहीर केली. शहर आणि जिल्हाध्यक्षांनी नव्या पदाधिकाऱ्यांना निवडीची पत्रे द्यावेत, असे कळविले.
ग्रामीण भागातील निवडींबाबत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि प्रदेश कार्याध्यक्षा प्रणिती शिंदे यांनी काही कार्यकर्त्यांची नावे दिली होती. मात्र, ही नावे डावलण्यात आल्याचे अॅड.पवार आणि काही नेत्यांचे म्हणणे आहे.
अॅड.पवार म्हणाले, मी कॉंग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. मला पदावरून दूर केले, याबाबत हरकत नाही, पण मला सन्मानाने बोलावून सांगितले असते तर योग्य राहिले असते. ज्या पद्धतीने या निवडी केल्या त्याला आमची हरकत आहे.
काँग्रेसने डिजिटल सभासद नोंदणी केली. त्या नोंदणीतून निवड प्रक्रिया करणे आवश्यक होते. पंढरपूर, मंगळवेढा हे दोन तालुके सुशीलकुमार शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघात येतात. या तालुक्यातील निवडी करताना सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांना विश्वासात घेणे आवश्यक होते.
प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
नव्या निवडीसंदर्भात सर्वच तालुक्यातील निष्ठावंत कॉंग्रेस कार्यकर्ते नाराज आहेत. काही माजी तालुकाध्यक्षांसोबत लवकरच बैठक होईल. या बैठकीनंतर आम्ही पुन्हा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे तक्रार करू. अँड- नंदकुमार पवार, मंगळवेढा
एकत्र बसून तोडगा काढतील.
सुशीलकुमार शिंदे हे आमचे नेते आहेत. जिल्हास्तरावरून आलेल्या शिफारशीनुसार ब्लॉक अध्यक्षांच्या निवडी केल्या. काही जागांबाबत तक्रार असेल तर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि सुशीलकुमार शिंदे एकत्र बसून तोडगा काढतील. – देवानंद पवार,
प्रदेश सरचिटणीस, कॉंग्रेस
मंगळवेढ्यातून प्रशांत साळे यांनी सर्वाधिक सदस्य नोंदणी केली
जिल्ह्यातील ब्लॉक अध्यक्षांच्या निवडी या सभासद नोंदणीच्या आधारावर झाल्या आहेत. मंगळवेढ्यातून प्रशांत साळे यांनी सर्वाधिक सदस्य नोंदणी केली. या तुलनेत नंदकुमार पवार यांच्याकडून अल्प सभासद नोंदणी झाली.
प्रशांत साळे यांचे कुटुंब सुशीलकुमार शिंदे यांच्या जवळचे आहे. आम्ही शिंदे यांच्या परस्पर निर्णय घेणे शक्यच नाही
नंदकुमार पवार यांना आम्ही जिल्हा डेलिगेट्समध्ये घेतलेले आहे. एकाच व्यक्तीकडे दोन-दोन पदे देऊ नये, असे पक्षाने सांगितले आहे. त्यानुसारच या निवडी झालेल्या आहेत. डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज