टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर जिल्ह्यात गावोगावी अनधिकृत व अधिकृत बोकाळलेल्या सावकारीचे प्रमाण परवानधारक सावकारांची संख्या निम्म्याने कमी झाल्याने ग्रामीण भागात सावकारीचे प्रमाण घटल्याचे दिसत आहे.
महिला बचत गटांच्या माध्यमातून गावोगावी मिळत असलेल्या बिनव्याजी व अत्यल्प व्याजाने मिळणाऱ्या कर्जातून लोकांच्या गरजा भागू लागल्याचे सावकारी कमी झाल्याचे मोठे कारण सांगितले जाते.
सोलापूर जिल्ह्यात अनधिकृत सावकारांची संख्या व त्यातून होणारे आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणावर असायचे. सावकारीतून गहाण ठेवलेली शेती व मालमत्ता परत मिळणेही कठीण.
सावकारीतून स्टॅम्पवर लिहून ठेवलेली मालमत्ता परत मिळण्यासाठी कायदेशीर व बेकायदेशीर करावा लागणारा संघर्ष, त्यातून होणारे वाद व प्रसंगी सावकारकी एखाद्याच्या आत्महत्येपर्यंत जाते.
मात्र, २०१४ च्या सावकारी अधिनियमानंतर गावोगावच्या अवैध सावकारीला लगाम लावण्यासाठी व गरजवंताला आर्थिक गरज होण्यासाठी सहकार खात्याकडून सावकारी परवाने देण्यात येतात
मागील पाच वर्षात परवानाधारक सावकारांची संख्या घटताना दिसत आहे. पाच वर्षांत परवानाधारक सावकार अगदी निम्म्यावर आले आहेत.
इकडे मागील पाच वर्षांत महिला बचत गटांची संख्या दुपटीहून अधिक, तर कर्जाची रक्कम चारशे पटींनी वाढली आहे.
बिनव्याजी व अल्पव्याजी कर्ज..
गावोगावच्या महिलांचे बचत गट आता सक्षम झाले आहेत. गटांना मिळणारे कर्ज काही रकमेपर्यंत बिनव्याजी व मोठ्या रकमेचे कर्ज अल्प व्याजदरात बँका देतात. वरचेवर बचत गटांची संख्या वाढत आहे व घेतलेले कर्ज महिला वेळेत परतफेड करीत असल्याने पाहिजे तेवढे कर्ज बँका गटांच्या महिलांना देत आहेत. त्यामुळे सावकारीतून कर्ज घेण्याचे प्रमाण दरवर्षी कमी होत असल्याने सावकारांच्या संख्येत मोठी घट होताना दिसत आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज